IMPIMP

Amol Mitkari On Sadabhau Khot | अमोल मिटकरींचा जोरदार टोला; म्हणाले – “पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या”

by nagesh
ncp leader and mla amol mitkari criticize sadabhau khot for not paid hotel bill

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Amol Mitkari On Sadabhau Khot | भाजप नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी हाॅटेलचे बिल न दिल्याने हाॅटेल मालकाने त्यांचा ताफा अडवल्याचा प्रकार गुरुवारी 16 जून रोजी घडला. ही घटना सांगोला (Sangola) येथील एका हाॅटेलमध्ये त्यांनी पार्टी केल्याची आहे. त्यानंतर बिल न दिल्याच्या कारणावरून हाॅटेल मालकाने खोत यांच्या गाड्यांचा ताफा अडवून बिलाचे पैसे मागितले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करत सदाभाऊ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (Amol Mitkari On Sadabhau Khot)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या. तुमच्यामुळे त्या हाॅटेल मालकाच्या जीवाला धोका निर्माण होतोय अशी सगळीकडे चर्चा आहे,” असा टोला मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला. तसेच पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी पोट फुटेस्तव आंदोलन करा आणि पवार साहेबांची उंची गाठायला आणखी सात जन्म वाट बघा,” असा सल्ला देखील मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांना दिला.

 

 

सदाभाऊ खोतांचा राष्ट्रवादीवर निशाणा –
सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर (NCP) जोरदार आरोप केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, पवार कुटुंबाकडून मला धोका असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
सदाभाऊ खोत यांच्यावर 2014 पासून हॉटेल बिल थकवल्याचा आरोप करत सोलापूर मध्ये (सांगोला) हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला. यानंतर खोत यांनी आरोप केले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- ncp leader and mla amol mitkari criticize sadabhau khot for not paid hotel bill

 

हे देखील वाचा :

Sadabhau Khot | सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘राष्ट्रवादीकडून माझ्या जीवाला धोका, विशेषत: पवार कुटुंबाकडून…’

Indians Deposit In Swiss Banks | नोटबंदी ठरली कुचकामी ! 14 वर्षात सर्वात जास्त झाला स्विस बँकेत भारताचा पैसा; 2021 मध्ये 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ

PMJJBY आणि PMSBY मधून कसे बाहेर पडावे ? किंवा आपल्या बँक अकाऊंटमधून कसे Deactivate करावे

 

Related Posts