IMPIMP

Neena Gupta | बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशावर नीना गुप्तांनी केलं भाष्य; म्हणाल्या…

by nagesh
Neena Gupta | bollywood actress neena gupta talking about why hindi films are not working

सरकारसत्ता ऑनलाईन  –  बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्या नेहमी बॉलिवूड इंडस्ट्रीतील समस्यांवर आपले स्पष्ट मत मांडताना दिसतात. त्यांनी अनेकवेळा आपलं खासगी आयुष्य ते बॉलिवूडमधील संघर्ष या सगळ्यावर भाष्य केले आहे. त्यांचा ‘वध’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाला पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटला नाही. यानंतर नीना गुप्तांनी (Neena Gupta) बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशावर एका मुलाखतीमध्ये भाष्य केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाल्या नीना गुप्ता?
नवीन पिढीतील कलाकार प्रेक्षकांशी संपर्क साधण्यात अयशस्वी ठरले का, असे विचारल्यावर नीना गुप्ता यांनी उत्तर दिले, नाही, “अजिबात नाही. हा एक टप्पा आहे. कोरोनानंतर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची सवय कमी झाली आहे आणि लोकांकडे असलेले पैसेही कमी झाले आहेत. चित्रपटगृहात कुटुंबासह चित्रपट पाहणे महाग झाले आहे आणि अनेकांचे रोजगारदेखील गेले आहेत. त्यामुळे हा एक टप्पा आहे आणि शेवटी ठीक होईल. जे चित्रपट चांगले असतील ते बॉक्स ऑफिसवर चालतील आणि माझा दाक्षिणात्य चित्रपट विरुद्ध बॉलिवूडवर विश्वास नाही.” असे त्या म्हणाल्या.

 

 

नीना गुप्ता (Neena Gupta) अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत.
बॉलिवूडमधील एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. ‘वध’च्या आधी त्या अमिताभ बच्चन
यांच्या ‘उंचाई’बरोबरच नीना या ‘गुडबाय’ या चित्रपटात दिसल्या होत्या.
नीना गुप्ता यांनी बधाई हो, शुभ मंगल ज्यादा सावधान, पंगा, खलनायक, स्वर्ग,
गांधी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
त्यांनी चित्रपटांबरोबर अनेक टीव्ही शोमध्ये देखील काम केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Neena Gupta | bollywood actress neena gupta talking about why hindi films are not working

 

हे देखील वाचा :

Winter Session 2022 | कर्नाटक सीमाप्रश्नी विरोधक आक्रमक; विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धरले सरकारला धारेवर…

Health Tips | फळांवर मीठ टाकणे आरोग्याच्या दृष्टीने पडू शकते महागात, खाल्ल्याने होऊ शकते नुकसान

Ajit Pawar | लवासा प्रकरणी अजित पवारांचे सरकारला आव्हान, म्हणाले- ‘तर सर्व यंत्रणा कामाला लावून आमची…’

Aaditya Thackeray | घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान दिले, पण त्यांनी… – आदित्य ठाकरे

 

Related Posts