IMPIMP

New Parliament Building Inauguration | ‘…तर आम्ही उद्घाटनाला गेलो असतो’ सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्याचे प्रत्युत्तर; म्हणाले- ‘आमंत्रणाची वाट बघण्यापेक्षा…’

by nagesh
New Parliament Building Inauguration | deepak kesarkar reply to supriya sule on parliament building inauguration invitation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – New Parliament Building Inauguration | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नव्या संसद भवानाच्या इमारतीचे लोकार्पण आज (रविवार) करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाला विरोधी पक्ष उपस्थित नव्हता. देशातल्या 20 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार (Boycott) घातला होता. विरोधी पक्ष नसल्याने हा कार्यक्रम अपूर्ण असल्याचे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे (Shinde Group) नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (New Parliament Building Inauguration)

दीपक केसरकर म्हणाले, आपण ज्या सदनात बसतो ते देशातील सर्वोच्च सदन आहे. त्याचं उद्घाटन आहे हे सगळ्यांना माहिती होतं. त्यामुळे या उद्घाटनाच्या आमंत्रणाची वाट बघत राहणं हे लोकशाहीला धरुन नाही. आमंत्रणाची वाट बघण्यापेक्षा विरोधी पक्षांनी कार्यक्रमाला जायला हवं होतं, असं केसरकर म्हणाले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

तुम्हाला या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं का? असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या. तीन दिवसांपूर्वी मला फक्त एक व्हॉट्सअॅप मेसेज आला होता, संसदीय कमेटी मेंबर (Parliamentary Committee Member) म्हणून तो मेसेज होता. एखाद्या नेत्याने किंवा मंत्र्याने एक फोन केला असता तरी आम्ही सर्वजण या कार्यक्रमाला गेलो असतो.

देशाची संसद चालवायची सर्व जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते.
पार्लमेंट ट्रेजरी बेंचद्वारे (Parliament Treasury Bench) सगळा कारभार चालतो.
खासदारांची बिलं पास करतना किंवा सत्ताधाऱ्यांच्या कार्य़क्रमासाठी केंद्रातले मंत्री नेत्यांना,
विरोधकांना फोन करतात. त्यांची कामे असतील तेव्हा हे फोन करतात. मात्र,
आजच्या कार्यक्रमाला बोलवण्यासाठी कोणाचाही फोन आला नाही.
सरकारमधील एखाद्या वरिष्ठ नेत्याने किंवा मंत्र्याने सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना एक फोन केला असता तर आम्ही सर्वजण राजीखुशीने या कार्यक्रमाला गेलो असतो.

Web Title : New Parliament Building Inauguration | deepak kesarkar reply to supriya sule
on parliament building inauguration invitation

Related Posts