IMPIMP

Nirmala Sitharaman | बारामतीमधील घराणेशाही संपविली तरच बारामतीचा विकास, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा राष्ट्रवादीवर घणाघात

by nagesh
Nirmala Sitharaman | union finance minister nirmala sitharaman criticize ncp party in baramati tour pune

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन – केंद्रीय अर्थमंत्री (Union Finance Minister) निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या बारामती दौऱ्यावर आल्या असून यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरादर टीका केली आहे. ज्यांच्या नावात राष्ट्रवादी आहे ते विकास कामात पक्षपातीपणा करत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस घराणेशाहीचा पक्ष आहे. राष्ट्रवादीमध्ये घराणेशाहीचीच परंपरा आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची कामे होत नाहीत. घराणेशाहीमुळेच (Dynasticism) काँग्रेसची बिकट अवस्था झाली, हे लक्षात घ्या, अशा शब्दात निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी राष्ट्रावादी आणि पवार कुटुंबावर जोरादार टीका (Criticize Pawar Family) केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Lok Sabha Constituency) विजय मिळवण्यासाठी भाजपने (BJP) बारामती मोहिम हाती घेतली आहे. यापार्श्वभूमीवर निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) बारामती दौऱ्यावर आल्या आहेत. रायबरेली (Rae Bareli), अमेठीतील (Amethi) घराणेशाहीबद्दल नागरिक काय म्हणतात ते बघा, असे म्हणत त्यांनी घराणेशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात भाजप उभा राणार असल्याचे सांगितले.

 

 

तर बारामतीचा विकास होईल

 

पंतप्रधान विरोधकांच्या जिल्ह्यात ही प्रगतीच्या योजना पोहोचवत आहेत. भाजप कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधींना विकासासाठी निधी दिला नाही. बारामतीत एकाच ठिकाणी प्रगती झाली आहे. अन्य ठिकाणी विकासाचा वणवा आहे. येथे एकाच कुटुंबावर छप्परफाड सोने पडते आहे. तालुक्यातील अनेक गावांना अद्याप पाणी नाही. समतोल विकास झालेला नाही, असे म्हणत निर्मला सितारामन यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पक्ष सांगेल तेव्हा बारामतीत येणार

 

बारामतीत भ्रष्टाचार (Corruption) व घराणेशाहीविरोधात भरपूर काम करण्यासाखे आहे. ईव्हीएम (EVM) आल्यापासून सगळे ठिकठाक असले तरी बुथप्रमुखांनी बोगस मतदार शोधून काढावेत. निवडणूक प्रक्रियेत लक्ष घालावे. माझ्याकडे बारामतीसह तेलंगणातील अन्य एका मतदारसंघाची जबाबदारी आहे. परंतु पक्ष जेव्हा जेव्हा सांगेन तेव्हा मी बारामतीला येणार असल्याचे सितारामण यांनी सांगितले.

 

 

तरच बारामतीचा विकास होईल

 

सितारामन यांनी राष्ट्रवादीच्या घराणेशाहीवर हल्लाबोल केला.
भाजप हा घराणेशाहीच्या विरोधात आहे. पक्षातील अनेकांनी महत्त्वाची पदे भूषवली.
यात सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक आहेत. देशात काँग्रेसने (Congress) घराणेशाहीचे राजकारण केले.
त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. आमचा लढा घराणेशाहीविरोधात आहे.
जे पक्ष घराणेशाही चालवतात ते स्वत:च्याच घरातील लोकांना पुढे करतात.
बारामतीमधील घराणेशाही संपविली तर बारामतीचा विकास होईल, असे त्यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Nirmala Sitharaman | union finance minister nirmala sitharaman criticize ncp party in baramati tour pune

 

हे देखील वाचा :

Sugar Control Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी करावे डाळिंबाचे सेवन, जाणून घ्या फायदे आणि करावा वापर

PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचा PFI चा कट उघड, यूपीत रचला होता स्फोट घडवण्याचा कट; ED चा खळबळजनक दावा!

BJP Vs Shivsena In BMC Elections 2022 | मुंबई जिंकण्यासाठी भाजपाची खतरनाक रणनीती! चौकशा लावून शिवसेनेला करणार हैराण, भ्रष्टाचाराच्या आरोपांची उठवणार राळ, मनसेसोबत छुपा समझोता?

 

Related Posts