IMPIMP

BJP Vs Shivsena In BMC Elections 2022 | मुंबई जिंकण्यासाठी भाजपाची खतरनाक रणनीती! चौकशा लावून शिवसेनेला करणार हैराण, भ्रष्टाचाराच्या आरोपांची उठवणार राळ, मनसेसोबत छुपा समझोता?

by nagesh
 BJP Vs Shivsena In BMC Elections 2022 | reshuffle in union cabinet shinde group is also likely to be included modi governmnet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – BJP Vs Shivsena In BMC Elections 2022 | मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने मोठी रणनीती तयार केली असून कोणत्याही स्थितीत मुंबई जिंकायचीच असा निर्धार भाजपाने केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गळाला लावून भाजपाने शिवसेनेला मोठा धक्का यापूर्वीच दिला आहे. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊतांवरील कारवाईनंतर ते कारागृहात गेले आहेत. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणनीतीप्रमाणे शिवसेनेच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावण्यात येणार आहे, तसेच भ्रष्टचाराच्या आरोपांची राळ सर्व स्थानिक भाजपा नेते एकाचवेळी उठवणार आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तपत्राने दिले आहे. (BJP Vs Shivsena In BMC Elections 2022)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी

 

या वृत्तात म्हटले आहे की, भाजपाच्या मुंबई महापालिका निवडणूक रणनीतीप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत किंवा माजी मुख्य सचिवांमार्फत काही प्रकरणांमध्ये खुली चौकशी होईल. तर काही प्रकरणात उच्च न्यायालय आणि लोकायुक्तांकडे याचिकाही सादर होतील, असे एका वरिष्ठ भाजप नेत्याने सांगितले. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने गेल्या 25 वर्षात शेकडो प्रकरणांमध्ये सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याबाबतचे आरोपपत्र भाजप तयार करीत आहे. (BJP Vs Shivsena In BMC Elections 2022)

 

 

दौन दिवसीय बैठकीत ठरली रणनीती

 

मुंबई महापालिकेत भाजपने 150 जागा जिंकण्याचा निर्धार केला असून त्यासंबंधी रणनीती ठरविण्यासाठी मुंबई भाजपची दोन दिवसीय बैठक गुरूवार व शुक्रवारी उत्तन येथे झाली, अशी माहिती मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. या बैठकीत निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करणे, आरोपपत्र निश्चित करणे, प्रत्येक प्रभागात निवडणूक केंद्र निहाय (बूथ) नियुक्त करण्यात आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांची रचना व कामे, पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी घ्यावयाचा आढावा आदींबाबत विस्तृत चर्चा झाली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

असा तयार करणार जाहीरनामा

 

निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर जनतेला भाजपकडून कोणते निर्णय व प्रकल्पांची अपेक्षा आहे, त्यावर सूचना मागवून पक्षाचा जाहीरनामा तयार केला जाणार आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रान उठविण्याची जबाबदारी मुंबईतील तीनही खासदार व आमदारांवर देण्यात आली आहे.

 

 

या प्रकरणांवरून करणार भ्रष्टचाराचे आरोप

 

कोरोना रुग्णालय उभारणीतील गैरव्यवहार, रस्त्यांचे डांबरीकरणातील गैरव्यवहार, भगवती रुग्णालयाच्या दुरूस्ती व नूतनीकरणातील गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे भाजपने तयार केली आहेत. शहर व उपनगरात अनेक टॉवर्सना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. टँकरलॉबीला सत्ताधार्‍यांचा आशिर्वाद असून शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार या माध्यमातून होत आहे. त्यामुळे अशा काही प्रकरणांची खुली चौकशी करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे करण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोपानंतर करणार चौकशांची मागणी

 

अशा प्रकारच्या चौकशी माजी न्यायमूर्ती किंवा मुख्य सचिवांमार्फत होतील. शिवसेनेमागे चौकशांचा ससेमिरा लावण्यासह न्यायालयांमध्ये काही प्रकरणे दाखल करून बेजार केले जाणार आहे. भाजपचे खासदार व आमदार पत्रकारपरिषदा आणि जनतेमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोप करून चौकशांची मागणी महापालिका आयुक्त आणि संबंधितांकडे करणार आहेत. याबाबतची रणनीती तयार करण्यात येत असल्याचे भाजप सूत्रांनी म्हटले आहे.

 

 

भाजपा-शिंदे गटात होतील अशा वाटाघाटी

 

महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदे गट युती करणार आहे. यासाठी 150 जागांचे लक्ष्य आहे.
प्रभागरचनेचा निर्णय झाल्यावर कोणाला किती व कोणत्या जागा असतील, यावर निर्णय होईल.
पण भाजप किंवा शिंदे गटाने जिंकलेल्या आणि अतिशय कमी मतांनी हरलेल्या जागा त्यांच्याकडे राहतील.
उर्वरित जागांमध्ये भाजपचा वरचष्मा राहील, असे वाटप होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मनसेसोबत छुपा समझोता?

 

तर मनसे मुंबईत 100 पेक्षा जास्त जागेवर उमेदवार उभे करून शिवसेनेची मते फोडण्यासाठी छुपे सहकार्य करणार आहे.
त्याबदल्यात मनसेच्या विजयाची शक्यता असलेल्या प्रभागांमध्ये भाजप किंवा शिंदे गट उमेदवार देणार नाही
किंवा अगदी कमकुवत उमेदवार दिला जाईल, असा छुपा समझोता झाला आहे.
शिवसेनेविरोधात रान उठविण्यासाठी मनसे भाजपला मदत करण्याची भूमिका घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

 

Web Title :-  BJP Vs Shivsena In BMC Elections 2022 | reshuffle in union cabinet shinde group is also likely to be included modi governmnet

 

हे देखील वाचा :

Modi Cabinet Reshuffle – Eknath Shinde Group | केंद्रीय मंत्रिमंडळात होणार फेरबदल, काही मंत्र्यांचा पत्ता होऊ शकतो कट, शिंदे गटाला मिळू शकते संधी

Body Detoxification Food | बॉडी डिटॉक्स करतो गुळ, जाणून घ्या आरोग्यासाठी कशाप्रकारे लाभदायक

Eknath Khadse | एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चांना उधाण ! खडसे फडणवीसांचे नाव घेत म्हणाले – ‘हे जेव्हा गोधडीत…’

 

Related Posts