IMPIMP

Nitin Deshmukh | किरीट सोमय्या यांच्यावर नितीन देशमुख यांची खालच्या भाषेत टीका; म्हणाले…

by nagesh
Nitin Deshmukh | mla nitin deshmukh use bad word while criticizing kirit somaiya

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन  Nitin Deshmukh | भाजप अमराठी माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठी माणसांच्या अ‍ॅन्टी करप्शनच्या चौकशा लावत आहे. असा घणाघात बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे. यावेळी नितीन देशमुख (Nitin Deshmukh) अ‍ॅन्टी करप्शनच्या कार्यालयाबाहेर पडताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी माध्यमांशी बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, ‘ज्या पद्धतीने माझी चौकशी झाली? तसे प्रश्न तुम्ही भाजपच्या लोकांनी विचारणार का? भाजप नेते किरीट सोमय्यांकडे कोट्यवधी रुपये कुठून आले? इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा सोमय्या यांना काय अधिकार आहे? यावेळी किरीट सोमय्या यांच्यावर बोलताना देशमुख यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केली. सोमय्या यांनी नारायण राणे, खासदार भावना गवळी यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता? मग आता ते गप्प का आहेत? असा सवाल देखील यावेळी बोलताना नितीन देशमुख यांनी उपस्थित केला.

 

राजन साळवी आणि वैभव नाईक यांच्यानंतर आता नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना एसीबीकडून चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. त्यानुसार आज (दि.१७) अमरावती येथील एसीबीच्या कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांची चौकशी झाली. यापूर्वी राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस पाठवली होती. नितीन देशमुख यांच्यासह आणखी दोघांना म्हणजेच आत्तापर्यंत ठाकरे गटातील तीघांना एसीबीची चौकशीसाठी नोटीसा आल्या आहेत.

 

या सर्व प्रकारावर बोलताना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी विद्यमान राज्य सरकारवर सडकून टीका
केली आहे. शिंदे गट आणि भाजपकडून ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे.
भ्रष्टाचारी वृत्तीची माणसे उलट सज्जन माणसाला भ्रष्टाचारी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आमदार नितीन देशमुख यांना नोटीस देऊन हा ठाकरे गटावर ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे.
निवडणुका समोर येतील तसं ठाकरे गटाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होणार आहे.
नितीन देशमुख यांच्याकडे काहीच कागदपत्रे सापडणार नाहीत.
आता भाजप आणि शिंदे गटाची लोकांना घृणा यायला लागली आहे.
असा घणाघात अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nitin Deshmukh | mla nitin deshmukh use bad word while criticizing kirit somaiya

 

हे देखील वाचा :

Anil Desai | ‘उद्या शिंदे गटाचे वकील मीच मुख्य नेता असल्याचे म्हणतील..,’ अनिल देसाई यांची शिंदे गटावर टीका

Maharashtra Politics | काँग्रेस नेत्याकडून नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना लिहिले पत्र

Chitra Wagh | संजय राऊतांच्या ‘त्या’ टिकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार, म्हणाल्या- ‘कार्यकारी संपादक जेव्हापासून बाहेर आले, तेव्हापासून…’

 

Related Posts