IMPIMP

NPS Rule Change | नॅशनल पेन्शन स्कीमच्या नियमात आजपासून झाले हे मोठे बदल, येथे जाणून घ्या पूर्ण डिटेल

by nagesh
NPS Rule Change | nps rule change pfrda changed the rules regarding trail commission know full details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NPS Rule Change | नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये पॉइंट्स ऑफ प्रेझेन्स (POPs) चे समर्थन करण्यासाठी, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने ट्रेल कमिशनबाबत नियम बदलले आहेत. ट्रेल कमिशन ती रक्कम असते जी जिचे पेमेंट एखादी गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराला करता. (NPS Rule Change)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पेन्शन फंड रेग्युलेटरने स्पष्ट केले आहे की एनपीएसमध्ये योगदानावरील ट्रेल कमिशनचे पेमेंट थेट डी-रेमिट (Direct Remittance) द्वारे दिले जाईल आणि ते ईएनपीएस सारखे असेल. हे त्या सबस्क्रायबर्सकडून केले जाईल ज्यांना POPs ने एनपीएस सिस्टमधी जोडले आहे. (NPS Rule Change)

 

आजपासून लागू हा नियम

ट्रेल कमिशनबद्दल माहिती देताना, पीएफआरडीएने सांगितले की, एनपीएस खात्यांच्या सोर्सिंगसाठी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, पीओपीला समर्थन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पीओपींना ट्रेल कमिशन देण्याचा नियम 1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे.

पीओपीएस पेमेंट चार्ज स्ट्रक्चर पीएफआरडीएने 31 जानेवारी रोजी जारी केले होते. पीओपीएसशी संबंधित सबस्क्रायबर्सच्या डी-रेमिट योगदानासाठी एनपीएस मध्ये जमा रकमेपैकी फक्त 0.20 टक्के रक्कम डी-रिमिट योगदानासाठी ट्रेल कमिशन म्हणून आकारली जाईल. ते किमान 15 रुपये आणि कमाल 10,000 रुपये असू शकते. लागू शुल्क युनिट कपातीद्वारे वसूल केले जाईल.

 

PFRDA ने सुरू केली डी – रेमिट सुविधा

अलीकडेच पीएफआरडीएने एनपीएस सबस्क्रायबर्ससाठी डी-रेमिट सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे सर्व सदस्य व्हर्च्युअल आयडी तयार करून त्यांच्या इच्छेनुसार एनपीएसमध्ये योगदान देऊ शकतात. हा स्टॅटिक व्हर्च्युअल आयडी पीआरएएन (PRAN) शी लिंक असतो.

नेट बँकिंग/आयएमपीएस/यूपीआयद्वारे तुमच्या बचत खात्यातून पीआरएएनमध्ये पैसे जमा करणे सुलभ करण्यासाठी डी-रेमिट ही ’ग्राहक केंद्रित उपाय’ म्हणून परिकल्पित केली आहे.
जर ट्रस्टी बँकेला सकाळी 9.30 वाजेपूर्वी योगदान मिळाले, तर या सुविधेमुळे ते त्याच दिवशी एनएव्हीमध्ये दिसू लागेल.
डी-रेमिट वापरण्यास सुलभ, ऑटो डेबिट सुविधा, ऑटो डेबिट रक्कम बदलणे, ऑटो डेबिट थांबवणे इत्यादीमुळे बरीच लोकप्रिय झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : –  NPS Rule Change | nps rule change pfrda changed the rules regarding trail commission know full details

 

हे देखील वाचा :

Mustard Oil Price | मोहरीच्या तेलात झाली घसरण, लोकांना मिळाला मोठा दिलासा, जाणून घ्या नवीन दर

PNB And ICICI Bank Hikes MCLR | एक तारखेला दोन बँकांनी दिला धक्का, पुन्हा इतके महागले कर्ज

Maharashtra Cabinet Expansion | ‘शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात आणखी 23 जणांना संधी मिळू शकते’ – सुधीर मुनगंटीवार

 

Related Posts