IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | ‘शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात आणखी 23 जणांना संधी मिळू शकते’ – सुधीर मुनगंटीवार

by nagesh
Sudhir Mungantiwar | The stance of Congress has always been against Shivaji and Hindu gods

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Cabinet Expansion | राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती भाजप (BJP) नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली. सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत 15 टक्के मंत्री करता येतात. त्यानुसार राज्यात एकूण 43 मंत्री करता येतात. यापैकी 20 मंत्री सध्या असून आणखी 23 मंत्र्यांची निवड केली जाऊ शकते. यात भाजप-सेनेच्या आमदारांना पुढील विस्तारामध्ये (Maharashtra Cabinet Expansion) संधी मिळू शकते. हा विस्तार येत्या काही दिवसांत लवकरच होऊ शकतो, असंही मुनगंटीवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकनाथ खडसे आदरणीय नेते
राज्यात प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळू दे अशी मागणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गणपती बाप्पाकडे केली होती. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे हे आदरणीय राहिलेले नेते आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर मी तक्रार करणे योग्य नाही. शेवटी मत व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पालकमंत्र्यांची घोषणा या गणेशोत्सवातच (Ganeshotsav) होईल, याबद्दल त्यांनी मनात शंका ठेवू नये. राज्याच्या हितासाठी देवाने त्यांना सद्बुद्धी द्यावी, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

 

काँग्रेस नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार?
शिंदे सरकारच्या कॅबिनेट विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) चर्चा सुरु असताना दुसरीकडे महाऱाष्ट्राच्या राजकारणात आणखी नवा भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक गट फुटून शिंदे गटात सहभागी होण्याची चर्चा आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता (Maharashtra Political Crisis) आहे. या विस्तारात काँग्रेसमधील एका गटाला स्थान मिळण्याचा अंदाज आहे.

 

महाराष्ट्र काँग्रेस मधील (Maharashtra Congress) खळबळ विधानपरिषद निवडणुकीपासून (Legislative Council Election) दिसली आहे.
काँग्रेसमधील काही मंत्र्यांसह आमदारांचा गट फुटण्याची चर्चा विधानपरिषद निवडणुकीच्या निकालापासून राजकीय वर्तुळात सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमधील गट फुटून शिंदे गटात (Shinde Group) सामिल झाला
तर काँग्रेसमधील काही माजी मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | second phase of maharashtra cabinet expansion soon 23 mlas may get ministry in the cabinet said bjps sudhir mungantiwar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 22 वर्षाच्या तरुणीवर केला लैंगिक अत्याचार; हडपसर पोलिस ठाण्यात तरूणाविरूध्द FIR

MP Vinayak Raut | ‘… तर हे 40 आमदार एकमेकांच्या उरावर बसतील’, शिवसेना खासदाराचा दावा

Maharashtra Political Crisis | राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार ! काँग्रेसचा एक गट फुटणार ? काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची शिंदे कॅबिनेटमध्ये लागणार वर्णी !

 

Related Posts