IMPIMP

OBC Reservation Maharashtra | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर 18 जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार

by nagesh
Five State Assembly Election-2022 | assembly election 2022 live updates uttar pradesh punjab goa manipur uttarakhand bjp congress pm security breach reactions

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन OBC Reservation Maharashtra | राज्यात सुरु असलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन चांगलाच वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण निवडणूक आयोगाने (Election Commission) ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर खुल्या प्रवर्गातून (open category) येत्या 18 जानेवारीला मतदान (Voting) घेण्याचे ठरवले आहे. त्यावरुन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ओबीसी आरक्षणाचे (OBC Reservation Maharashtra) मारेकरी असल्याचा आरोप भाजप (BJP) करत आहे. त्यात आता निवडणुका जाहीर झाल्याने विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

राज्यात सध्या 21 डिसेंबरला 106 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषद भंडारा, गोंदिया, 15 पंचायत समित्या, 4 हजार हून अधिक ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुका (By-election) होणार आहेत. या निवडणुकीत ओबीसी आरक्षणातील (OBC Reservation) राखीव जागांवर निवडणूक आयोगाने सात दिवसांत कार्यक्रम जाहीर करावा असे कोर्टाने म्हटले होते. त्यानुसार आता 18 जानेवारीला ओबीसी जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात येणार आहे. तसेच 21 डिसेंबर आणि 18 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांचा निकाल (Election result) एकत्रीत घोषित केला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. (OBC Reservation Maharashtra)

 

दरम्यान, राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका (Municipal elections) होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- OBC Reservation Maharashtra | obc elections will be held january 18 open category canceled seats obcs Election Commission

 

हे देखील वाचा :

Judge Pushpa V. Ganediwala | जस्टिस गनेडीवाला कायमस्वरूपी जज बनणार नाहीत ! ‘स्किन-टु-स्किन कॉन्टॅक्ट’चा निर्णय देणार्‍या जस्टिसला SC कॉलेजियमकडून झटका, प्रमोशन रोखले

Anil Deshmukh Case | पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांचं प्रकरण ! अनिल देशमुख प्रकरणात पुण्यातील ‘त्या’ पोलीस उपायुक्तांची ईडीकडून चौकशी

Riteish Deshmukh B’day Spl | आर्किटेक पासून अ‍ॅक्टर बनला अभिनेता रितेश देशमुख; ना कोणती ओळख, ना कोणती प्रसिद्धी, ‘असा’ होता प्रवास

 

Related Posts