IMPIMP

Old Income Tax Regime | टॅक्सपेयर्ससाठी मोठा झटका ! Old Tax Slab व्यवस्था होऊ शकते बंद, महसूल सचिवांनी दिला सल्ला

by nagesh
Old Income Tax Regime | old income tax regime with deductions must go said by revenue secretary tarun bajaj

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाOld Income Tax Regime | वाढत्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, सरकार करदात्यांना आणखी एक मोठा धक्का देण्याची तयारी करत आहे. सरकार जुनी कर प्रणाली रद्द करू शकते ज्यामध्ये 70 प्रकारची सूट मिळते. महसूल सचिव तरुण बजाज (Revenue Secretary Tarun Bajaj) यांनी नवीन करप्रणालीकडे लोकांचे आकर्षण वाढवण्यासाठी हा प्रस्ताव दिला आहे. (Old Income Tax Regime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

तरुण बजाज यांनी दिला प्रस्ताव
नवीन कर प्रणाली (New Tax Slab) लागू झाल्यानंतरही लोक जुन्या कर प्रणालीकडे अधिक आकर्षित झाले आहेत. अशा स्थितीत लोक नवीन करप्रणालीकडे दुर्लक्ष करत आहेत. तरुण बजाज यांनी करदात्यांना प्राप्तीकराची नवीन प्रणाली स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव दिला आहे.

 

2020 – 21 मध्ये नवीन टॅक्स स्लॅब
प्राप्तीकराची नवीन प्रणाली 2020 मध्ये सुरू झाली. यामध्ये कराचा दर कमी आहे पण, कपातीची सुविधा मिळत नाही. अशा स्थितीत करदात्यांना सूट न मिळाल्याने कमी रस दाखवत आहेत. बहुतेक करदाते जुन्या कर प्रणालीनुसार त्यांचे प्राप्तीकर विवरणपत्र भरतात. (Old Income Tax Regime)

 

लोक का निवडत नाहीत नवीन स्लॅब
तरुण बजाज म्हणाले, लोकांना यामुळे नवीन प्रणाली वापरायची नाही.
जोपर्यंत जुन्या व्यवस्थेचे आकर्षण कमी होणार नाही तोपर्यंत नवीन व्यवस्था अंगीकारायला लोक तयार होणार नाहीत.
जोपर्यंत आम्ही असे करणार नाही तोपर्यंत आपण टॅक्स दर कमी करू शकणार नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नवीन टॅक्स स्लॅब

नवीन प्राप्तीकर स्लॅबमध्ये 5 लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागत नाही.

5 लाख ते 7.5 लाखांपर्यंत आता फक्त 10 टक्के कर भरावा लागतो.

जर तुमचे उत्पन्न 7.5 लाख ते 10 लाखांपर्यंत असेल तर आता तुम्हाला 15% कर भरावा लागतो.

जर तुमचे उत्पन्न 10 लाख ते 12.50 लाख रुपये असेल तर नवीन स्लॅबनुसार 20% कर भरावा लागतो आणि दरवर्षी 12.5 लाख ते 15 लाख रुपये कमावणार्‍यांना आता 25% कर भरावा लागतो.

15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर पूर्वीप्रमाणेच राहील.

 

Web Title :- Old Income Tax Regime | old income tax regime with deductions must go said by revenue secretary tarun bajaj

 

हे देखील वाचा :

Raw Turmeric Benefits | कच्च्या हळदीचे आरोग्याशी संबंधीत अनेक फायदे, करून पहा!

Pune Cyber Crime | क्रिप्टो करन्सी गुंतवणुक योजनेत अनेक पुणेकरांची फसवणूक; सायबर पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून केली अटक

Pune Crime | कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील 64 वर्षाच्या आरोपीला जामीन मंजूर

 

Related Posts