IMPIMP

Pune Cyber Crime | क्रिप्टो करन्सी गुंतवणुक योजनेत अनेक पुणेकरांची फसवणूक; सायबर पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून केली अटक

by nagesh
Pune Cyber Crime News | He sent the money thinking that his sister in America was in trouble; One and a half lakhs stolen by cyber thieves

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Cyber Crime | पुणे शहरातील गुंतवणुकदारांना (Investors) आकर्षक परताव्याचे (Attractive Return) आमिष (Lure) दाखवून अनेकांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) दिल्ली येथून अटक (Arrest) केली आहे. आरोपीने पुणे शहरातील (Pune Cyber Crime) नागरिकांची सुमारे 84 लाख 34 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Case) केली आहे. याबाबत अनेक तक्रारी सायबर पोलिसाना प्राप्त झाल्या आहेत. गणेश शिवकुमार सागर Ganesh Shivkumar Sagar (वय – 47 रा. द्वारका, नवी दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दुबई येथील बिटसोलाईव्हज प्रा. लि. (Bitsolives Pvt. Ltd. Dubai) कंपनीच्या पदाधिकारी व इंग्लंड येथिल बुल इन्फोटेक कंपनीच्या (Bull Infotech Company England) पदाधिकाऱ्यांनी भारतात व भारताबाहेर सेमिनार (Seminar) आयोजित केले. या सेमिनारमध्ये गुंतवणूक दारांना बक्सकॉईन (Bucks Coin) या क्रिप्टो करन्सीमध्ये (Cryptocurrency) मार्केटिंग स्किममध्ये गुंतवणूक करायला लावली. त्यासाठी कॅश फिनिक्स (Cash Phoenix) नावाचे क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchange) तयार करुन स्वतंत्र ब्लॉकचेन विकसीत करुन बक्सकॉईनचा दर वाढून चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सुरु केलेले प्लॅटफॉर्म, प्लॅन्स, वेबवसाईट पोर्टल हे देखील काही दिवसांनी बंद केले. आरोपींनी केवळ पुण्यातीलच (Pune Cyber Crime) नाही तर जगभरातील अनेक लोकांची फसवणूक केली.

 

पुणे सायबर पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपास करत असताना दुबई येथील बिटसोलाईव्हज प्रा. लि. कंपनीचा पदाधिकारी व गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार हा दिल्लीत (Delhi) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने दिल्ली जाऊन आरोपीची माहिती जमा केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे (Technical Analysis) आरोपीचा पत्ता शोधून काढला. आरोपी दिल्लीतील उत्तमनगर येथे पोलिसांना गुंगारा देऊन लपून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी (Pune Cyber Police) आरोपीला राहत्या घरातून ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), आर्थिक व सायबर उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke),
सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule), वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके (Senior Inspector of Police D.S. Hake)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण (Police Inspector Ankush Chintaman),
पोलीस निरीक्षक संगिता माळी (Police Inspector Sangita Mali), सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव (API Shirish Bhalerao),
पोलीस हवालदार अस्लम आत्तार, पोलीस नाईक मंगेश नेवसे, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार, योगेश वाव्हळ, नितेश शेलार, प्रविणसिंह राजपूत, अंकिता राघो, सारीका दिवटे, दिनेश मरकड, किरम जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Cyber Crime | Many Punekars cheated in cryptocurrency investment scheme Pune Cyber police arrested the accused from Delhi

 

हे देखील वाचा :

Sambharaje Chhatrapati | संभाराजेंची आता ठाकरे सरकारला साथ?; ‘या’ मंत्र्याने केलं सूचक वक्तव्य

Pune Crime | कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील 64 वर्षाच्या आरोपीला जामीन मंजूर

Mouni Roy Bold Saree Photo | मौनी रॉयनं पारदर्शक साडीसाठी केले चक्क इतके रुपये खर्च, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क.. !

 

Related Posts