IMPIMP

Online Payment New Rule | 1 जानेवारीपासून ऑनलाइन पेमेंटचे नियम बदलणार, ‘हे’ नक्कीच तुम्हाला माहिती असायला हवं

by nagesh
Online Payment New Rule | online payment new rules will change from 1 january 2022 rbi on implementing tokenisation

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Online payment New Rule | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) गेल्या वर्षी ऑनलाइन पेमेंट नियमांमध्ये बदल (Online payment New Rule) जाहीर केले होते. या वर्षी सप्टेंबरमध्ये, आरबीआयने (RBI) ऑनलाइन व्यापाऱ्यांना वर्षाच्या अखेरीस टोकन लागू करण्यासाठी वेळ दिला होता. टोकन सिस्टमबाबत (tokenisation) बँका वेळोवेळी आपल्या ग्राहकांना माहिती देत आहेत.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

देशात डिजिटल पेमेंटमध्ये वाढत होत आहे. बहुतांश लोक जेवण ऑर्डर करण्यासाठी, कॅब बुक करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही खरेदीसाठी ऑनलाइन पेमेंट करत आहेत. मात्र डिजिटल पेमेंटचे जग जसजसे वाढत आहे, तसतसे सायबर फसवणुकीच्या (cyber crime) घटना वेगाने वाढत आहेत. सायबर गुन्हेगार (cyber criminals) लोकांचा डेटा चोरण्यासाठी आणि त्यांचे पैसे हडपण्यासाटी नवीन तंत्रज्ञान आणि अॅप्सचा वापर करतात.

 

या सर्व धोक्यांना लक्षात घेऊन लोकांना चांगली सुरक्षा देण्यासाठी आणि ऑनलाइन पेमेंट सुरक्षित करण्यासाठी, (Online payment New Rule) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सर्व व्यापारी आणि पेमेंट गेटवे यांना वापरकर्त्याची संपूर्ण माहिती आणि डेबिट आणि क्रेडिट कार्ड तपशील (debit and credit cards) काढण्यास सांगितले आहे.

 

1 जानेवारीपासून नवीन नियम लागू होतील

आरबीआयच्या आदेशानंतर व्यापारी आणि पेमेंट गेटवे (payment gateways) यांना त्यांच्या सर्व्हरवर ठेवलेली युजर्सची सर्व माहिती डिलीट करावी लागेल. याचा अर्थ असा की वेबसाइटवर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला आता कार्डचे संपूर्ण तपशील द्यावे लागेल. बँकांनी आपल्या ग्राहकांना नवीन नियमांबद्दल सांगण्यास सुरुवात केली आहे. अग्रगण्य खाजगी बँकांपैकी एक HDFC ने आपल्या ग्राहकांना संदेश देत आहे कि त्यांना एकतर संपूर्ण कार्ड तपशील द्यावा लागेल किंवा टोकनायझेशनची निवड करावी लागेल.

 

टोकनायझेशन म्हणजे काय? (What is tokenisation)

सध्या ऑनलाइन पेमेंट किंवा ट्रांजैक्शन करण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा 16 अंकी क्रमांक, कार्ड एक्सपायरी डेट, सीव्हीव्ही आणि वन-टाइम पासवर्ड टाकावा लागतो. पेमेंट अॅप किंवा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर तुमचा कार्ड क्रमांक स्टोर केला जातो आणि तुम्ही फक्त CVV आणि OTP टाकून पेमेंट करू शकता. पण आता ते होणार नाही. टोकनायझेशन वास्तविक कार्ड नंबरला एक पर्यायी कोड दिला जातो, ज्याला “टोकन” म्हणतात.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

टोकनायझेशनच्या मदतीने, कार्डधारकाला त्याच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे सर्व तपशील शेअर करण्याची गरज नाही. टोकनायझेशन म्हणजे मूळ कार्ड क्रमांक पर्यायी कोडद्वारे बदलणे. या कोडलाच टोकन म्हणतात. टोकनाइजेशन प्रत्येक कार्ड, टोकन रिक्वेस्टर आणि व्यापारी यांच्यासाठी वेगळं असेल. टोकन तयार झाल्यानंतर, टोकनयुक्त कार्ड डिटेल्स (tokenisation) मूळ कार्ड क्रमांकाच्या जागी वापरले जाऊ शकते. ही सिस्टीम ऑनलाइन पेमेंटसाठी अधिक सुरक्षित मानली जात असल्याचे बोलले जात आहे.

 

टोकनाइजेशन अधिक सुरक्षित कसे आहे (How is tokenisation safer) 

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, टोकनयुक्त कार्ड व्यवहार सुरक्षित मानले जाते
कारण त्याद्वारे ऑनलाइन पेमेंट करताना वास्तविक कार्ड तपशील व्यापाऱ्यासोबत शेअर केला जात नाही.
टोकन कार्ड नेटवर्कद्वारे वास्तविक कार्ड डेटा सुरक्षित मोडमध्ये गोळा केला जातो.
आरबीआयने असेही म्हटले आहे की टोकनला परत मूळ कार्ड तपशीलामध्ये डी-टोकनायझेशन म्हणून ओळखले जाते.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

 

1 जानेवारीपासून काय बदल होतील? (What will change from January 1)

नवीन वर्षात 1 जानेवारीपासून, तुम्ही एखाद्याला ऑनलाइन पेमेंट कराल तेव्हा,
तुम्हाला प्रमाणीकरणच्या एका अतिरिक्त घटकासह (Additional factor of authentication-AFA)
तुमची संमती द्यावी लागेल. ते झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या कार्डचा CVV आणि OTP टाकून पेमेंट करू शकाल.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Online Payment New Rule | online payment new rules will change from 1 january 2022 rbi on implementing tokenisation

 

हे देखील वाचा :

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचा पडळकरांना टोला; म्हणाले – ‘स्वतःची किंमत वाढवण्यासाठी अजित पवारांवर टीका’

Temperature in Maharashtra | थंडी गायब होणार? राज्यात तापमान वाढीचा अंदाज; विदर्भातील थंडीची लाट ओसरणार

Zero Waste Wedding Baramati | बारामतीत पार पडला कचरा विरहीत लग्नसोहळा

 

Related Posts