IMPIMP

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचा पडळकरांना टोला; म्हणाले – ‘स्वतःची किंमत वाढवण्यासाठी अजित पवारांवर टीका’

by nagesh
Dhananjay Munde | dhananjay munde criticism on state govt for loss agriculture crop

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Dhananjay Munde | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीत जर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हाती राज्य दिले तर ते 4 दिवसांत विकतील. असा जोरदार घणाघात विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी बुधवारी केला. पडळकरांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पलटवार केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना धनजंय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, ‘गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे अजितदादांवरील आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि सवंग प्रसिद्धीसाठी केलेला भाबडा प्रयत्न असल्याचा टोला धनजंय मुंडे यांनी लगावला.

दरम्यान, काल (बुधवारी) हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ माजला होता.
यावेळी सत्ताधारी आणि विरोधकात आरोपांचे सत्र सुरु होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत.
त्यामुळे भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला गेला.
अशावेळी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या कारभार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)
यांच्याकडे देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती.
तसेच भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी अजित पवारांकडे कारभार देण्याचा सल्ला दिला.
परंतु, अजित पवारांच्या हातात राज्य दिलं तर ते 4 दिवसांत विकून मोकळे होतील अशी टीका पडळकर यांनी केली होती.
यानंतर धनजंय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Dhananjay Munde | NCP Minister dhananjay mundes reaction on the dispute between ajit pawar and bjp mla gopichand padalkar

 

हे देखील वाचा :

Temperature in Maharashtra | थंडी गायब होणार? राज्यात तापमान वाढीचा अंदाज; विदर्भातील थंडीची लाट ओसरणार

Zero Waste Wedding Baramati | बारामतीत पार पडला कचरा विरहीत लग्नसोहळा

Food and Drug Administration Pune | …म्हणून पुण्यात वडापाव, पोहे किंवा अन्य खाद्यपदार्थ पेपरमध्ये गुंडाळून मिळणार नाही

 

Related Posts