IMPIMP

Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, पोलिसांचा लाठीचार्ज

by nagesh
Pankaja Munde | dasara melava 2022 bjp pankaja munde bhagwan bhaktigad police lathicharge on supporters

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन देशासह राज्यात आज दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज दसरा मेळाव्यांची (Dasara Melava) धूम पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मुंबईत दसरा मेळावे होणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांसोबत भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा सावरगाव येथे मेळावा झाला. मेळाव्यात पंकजा मुंडेंनी अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या भाषणानंतर मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बीड जिल्ह्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा (Bhagwangad) यांच्या सावरगाव घाट गावात पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह खासदार प्रितम मुंडे (MP Pritam Munde), यशश्री मुंडे (Yashshree Munde), महादेव जानकर (Mahadev Jankar), आमदार मेघना बोर्डीकर (MLA Meghna Bordikar), शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) याच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पंकजा मुंडेंच्या आधी महादेव जानकर आणि प्रितम मुंडे यांची भाषणे झाली. दरम्यान, पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर मेळाव्यात मोठा गोंधळ झाला.

 

पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर मेळाव्याच्या ठिकाणी पोलीस (Beed Police) आणि भाजप समर्थकांमध्ये
बाचाबाची झाली. या बाचाबाची मुळे तिथे एक गोंधळ उडाला.
या गोंधळादरम्यान काही नेते व्यासपीठावरच अडकले होते.
यावेळी व्यासपीठावरुन पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, दोन पोलिसांमुळे गोंधळ उडाल्याची माहिती मिळत आहे.
त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुंडे समर्थकांनी केली आहे.
या सर्व गोंधळात तीन तोळ्याचे लॉकेट आणि अनेकांची पाकिटे चोरीला गेली आहेत.

 

 

Web Title :- Pankaja Munde | dasara melava 2022 bjp pankaja munde bhagwan bhaktigad police lathicharge on supporters

 

हे देखील वाचा :

Pankaja Munde | रुकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही, आता 2024 च्या तयारीला लागा, पंकजा मुंडेंचा एल्गार (व्हिडिओ)

Aurangabad Crime | औरंगाबाद पोलिसांचा फार्म हाऊसवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापलं, एकनाथ शिंदेंची भाजप विरोधातील विधानं व्हायरल; शिंदे गट सापडला कोंडीत

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे हरणारी लढाई लढताहेत का?

 

Related Posts