IMPIMP

Pankaja Munde | 2 वर्ष काय टाळ कुटत होते का? पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना खडा सवाल

by nagesh
Pankaja Munde vs Dhananjay Munde | BJP leader pankaja munde slams NCP minister dhanajay munde after beed district nagar panchayat election result

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन नगरपंचायत निवडणुकीच्या (Nagar Panchayat election) निमित्ताने बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादीचे नेते (NCP) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आमने सामने आले आहेत. बीडमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तुम्ही 32 व्या नंबरचे मंत्री आहात मग 2 वर्षे काय टाळ कुटत होते का? असा सवाल पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी थेट धनंजय मुंडे यांना केली आहे. बीड जिल्ह्यातील (Beed district) वडवणी येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

निवडणुकीच्या प्रचारसभेत 100 कोटींची घोषणा केली. पाच नगरपंचायतला 500 कोटी आणणार, असं विधान धनंजय मुंडे यांनी पाटोदा (Patoda) येथील सभेत केलं होतं. या विधानाचा समाचार घेताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, सगळं माझ्याच गळ्यात आले पाहिजे. हे आमदार (MLA) आणि पालकमंत्री यांचं सुरु आहे. याला जेलमध्ये घालू त्याला जेलमध्ये घालू सगळ्यांना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री (Guardian Minister) पाहिजे का? कुणाचं घर बरबाद करायचं असं राजकारण मुंडे साहेबांनी शिकवलं नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

महाविकास आघाडी सरकारचं भविष्य फार काही चांगलं नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही.
राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. त्याची सुरुवात नगर पंचायत निवडणुकीच्या (Nagar Panchayat election) विजयापासून होईल.
महाविकास आघाडीचे कबाड निघणार आहे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर (OBC reservation) कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.
कोणत्या तोंडाने लोकांसमोर येतात. आरक्षण द्या नाहीतर नका देऊ आमची दुकानं चालली पाहिजे,
असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना वाटतं, असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

Web Title :- Pankaja Munde | what is going on from last 2 years bjp leader pankaja munde question to ncp leader and minister dhananjay munde

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 47 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pankaja Munde | ‘ठाकरे सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही’ ! पंकजा मुंडेंनी सांगितलं सत्ता कधी बदलणार

Amit Shah | शिवरायांनी केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर देशाच्या दोन तृतीयांश भागावर राज्य केलं – अमित शाह

 

Related Posts