IMPIMP

Peeing After Alcohol Drinking | दारू प्यायल्यानंतर लघवीला जास्त का होते? जाणून घ्या कारण आणि धोका

by nagesh
Peeing After Alcohol Drinking | why does alcohol make you pee more urine clear colour when you drink

सरकारसत्ता ऑनलाइन –  Peeing After Alcohol Drinking | तुम्हालाही पार्टीत दारू प्यायल्यानंतर वारंवार लघवी होण्याची समस्या भेडसावत आहे का? तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे का की जेव्हा तुम्ही दारूचे सेवन करता तेव्हा तुम्हाला वारंवार लघवी (Urine) होते. अल्कोहोलमुळे (Alcohol) शरीरातील लघवीचा फ्लो वाढतो. यामुळे मद्य प्राशन केल्यावर पुन्हा पुन्हा लघवी करण्याच्या फिलिंग्ज मधून जावे लागते. यामागचे कारण जाणून घेऊया – (Peeing After Alcohol Drinking)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पहिले कारण म्हणजे किडनी (Kidney) आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते. हे काम किडनी रक्तातील प्लाझ्मा ऑस्मोलालिटीचे देखरेख ठेवून करते.

 

ऑस्मोलॅलिटी ब्लडमधील पार्टिकल्स आणि द्रवाचे प्रमाण दर्शवते. जर रक्तात पार्टिकल्सपेक्षा जास्त द्रव असेल तर किडनी शरीराला जास्त लघवी सोडण्याचा संकेत देते.

 

जेव्हा रक्तात द्रवापेक्षा जास्त पार्टिकल्स असतात, तेव्हा किडनी द्रव रोखून ठेवते आणि लघवी करण्याची गरज भासत नाही. अल्कोहोल हे द्रव असल्यामुळे, किडनी जास्त प्रमाणात लघवी सोडण्यासाठी शरीराला सिग्नल देत असते. (Peeing After Alcohol Drinking)

 

दारूमुळे जास्त तयार होते यूरीन –
दुसरे कारण म्हणजे दारू मूत्रवर्धक असते, तिच्या सेवनाने वारंवार लघवीला आल्याची भावना येते.

 

दारूचे सततचे सेवन शरीरात व्हॅसोप्रेसिन हार्मोन तयार होऊ देत नाही. व्हॅसोप्रेसिनला डॉक्टर अँटी-ड्युरेटिक हार्मोन (ADH) देखील म्हणतात. ADH किडनीला लघवी थांबवण्याचा संकेत देते.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पण दारू ADH दाबून जास्त पाणी सोडण्यासाठी किडनीवर दबाव आणते. यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या सुरू होते, त्यामुळे लघवी जास्त प्रमाणात तयार होते, तसेच डोकेदुखी आणि मळमळची (Headache, Nausea) समस्या होते.

 

अल्कोहोल आणि मूत्र सोडण्यावर परिणाम करणारे घटक

अल्कोहोलचे प्रमाण –
अल्कोहोल अँड अल्कोहोलिझम जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, अल्कोहोल फ्री ड्रिंकच्या तुलनेत अल्कोहोलयुक्त ड्रिंक घेतल्यास लघवीचे उत्पादन 2 ते 4 टक्क्यांनी वाढते. न्यूट्रिएंट्स या जर्नलमध्ये प्रकाशित आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की थोड्या-थोड्या प्रमाणात हाय-अल्कोहोल ड्रिंकचे सेवन आणि लो अल्कोहोल ड्रिंकमुळे किडनीच्या कार्यावर कमी परिणाम होतो.

 

किती वेळा दारू पिता –
अल्कोहोल प्यायल्यानंतर वारंवार लघवी होणे हे शरीराला दारूची किती सवय आहे यावर अवलंबून असते. दारूचे जास्त प्रमाणात सेवन करणार्‍या लोकांमध्ये ड्यूरिटिक इफेक्ट दारूचे कमी प्रमाणात सेवन करणार्‍या लोकांच्या तुलनेत खुपच कमी असतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की दारू जास्त प्रमाणात पिण्यास सुरुवात करावी.

दारू पिण्यापूर्वी हायड्रेशन लेव्हल (Hydration Level)
अल्कोहोलिझम अँड अल्कोहोलिझम जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात असे आढळून आले आहे
की जे लोक दारू पिण्यापूर्वी अनहायड्रेटेड होते त्यांच्यात हायड्रेटेड लोकांच्या तुलनेत ड्युरेटिक इफेक्ट कमी दिसून येतात.
मात्र, अनेक संशोधनांमध्ये असे सूचित केले गेले आहे की प्रत्येक व्यक्तीचे शरीर अल्कोहोलवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते.
उदाहरणार्थ काही लोकांना दारू प्यायल्यानंतर जास्त लघवीला होतो तर तर काही लोकांवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Peeing After Alcohol Drinking | why does alcohol make you pee more urine clear colour when you drink

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | सुप्रीम कोर्टात नेमंक काय झालं? ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवा ! शिंदे गटाची मोठी मागणी

Gold Silver Rate | सोन्याचा भाव 500 रुपयांनी घसरला, चांदी सुद्धा झाली स्वस्त; जाणून घ्या 1 तोळा सोन्याचा नवीन दर

SBI Clerk Recruitment 2022 | एसबीआय क्लार्क भरतीसाठी अर्ज आजपासून सुरू, पदवीधरांसाठी 5008 सरकारी नोकर्‍या

 

Related Posts