IMPIMP

Permanent Work From Home | ‘पर्मनंट वर्क फ्रॉम होम’ पाहिजे का? सॅलरी स्ट्रक्चर बदलण्याच्या तयारीत सरकार, मिळू शकतात अनेक फायदे

by nagesh
Work From Home New Rule | commerce ministry announces new work from home rules for sezs details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Permanent Work From Home | कोरोनामुळे भारतात वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वेगाने वाढत आहे. यामध्ये कर्मचार्‍यांना (employees) मदत मिळत असली तरी कंपन्यांचा सुद्धा फायदा होत आहे. यामुळे आता अनेक कंपन्या कोरोनाची प्रकरणे कमी होऊनही वर्क फ्रॉम होम अवलंबत आहेत. तर कामगार मंत्रालय (Ministry of Labor) सुद्धा वर्क फ्रॉम होमबाबत लवकरच कंपन्यांच्या वेतन रचनेत बदल करण्याची परवानगी देऊ शकते. (Permanent Work From Home)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम (Permanent Work From Home) चा पर्याय निवडणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतन संरचनेत बदल होऊ शकतो. सूत्रांनुसार कामगार मंत्रालयाच्या परवानगीनंतर कंपन्या कर्मचार्‍यांच्या हाऊस रेंट अलाऊन्समध्ये (एचआरए) कपात करू शकतात. तसेच पायाभूत संरचनेच्या अंतर्गत भरपाई खर्चात वाढ होऊ शकते.

 

वीज -वायफायचा खर्च :
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याने सांगितले की, कामगार मंत्रालय सेवा अटी पुन्हा परिभाषीत करण्यासाठी स्थायी आदेश जारी करू शकते. याशिवाय नवीन बदलांमध्ये कर्मचार्‍यांना फायदे सुद्धा होतील.

घरातून काम करताना कर्मचार्‍यांना वीज आणि वायफायसारख्या काही पायाभूत सुविधांचा खर्च करावा लागतो. हे पैसे देण्यासंदर्भात सरकार एक पॉलिसी तयार करण्यावर काम करत आहे. ज्याच्या मदतीसाठी एका कन्सल्टंट फर्मला सुद्धा सहभागी करण्यात आले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

वर्क फ्रॉम होमला कायदेशीर (legalize the work from home) रूप देण्यासाठी सरकारची अंतर्गत सुद्धा सहमती आहे. मार्च 2020 मध्ये कोरोना महामारी आल्यानंतर वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वेगाने वाढल्याचे दिसले.

 

इतर देशांमध्ये सुद्धा वाढले WHF :
कोरोना महामारीमुळे वर्क फ्रॉम होम अनेक देशांनी वेगाने अवलंबले आहे.
भारताशिवाय याचे जास्त प्रमाण परदेशातही दिसून आले आहे.
यासाठी नियम-कायदे (Rules and regulations) बनवले जात आहेत.
अलिकडेच पोर्तुगालच्या संसदेने ‘वर्क फ्रॉम होम’ बाबत एक कायदा संमत केला आहे.
ज्यामध्ये कर्मचार्‍याची शिफ्ट संपल्यानंतर कोणतीही कंपनी त्याला कॉल किंवा मेसेज करू शकत नाही.
जर कंपनीने असे केले तर कंपनीला दंड लावण्याची तरतुद आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Permanent Work From Home | employee permanent work from home salary structure detail

 

हे देखील वाचा :

Miss World-Mansa Waransi | मिस वर्ल्ड 2021 स्पर्धा तूर्तास स्थगित ! भारताच्या ‘मानसा वाराणसी’सह 17 सौंदर्यवतींना कोरोनाची लागण

OBC Reservation Maharashtra | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर 18 जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार

Judge Pushpa V. Ganediwala | जस्टिस गनेडीवाला कायमस्वरूपी जज बनणार नाहीत ! ‘स्किन-टु-स्किन कॉन्टॅक्ट’चा निर्णय देणार्‍या जस्टिसला SC कॉलेजियमकडून झटका, प्रमोशन रोखले

 

Related Posts