IMPIMP

Personal Finance | अवघे 3,000 रुपये वाचवून सुद्धा बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे कॅलक्युलेशन

by nagesh
Personal Finance | money making investment tips crorepati kaise bane how to become millionaire

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Personal Finance | आपल्याला वाटते की, जीवनात सर्व सुखसोयी असाव्यात, जेणेकरून कुटुंबाचे चांगले संगोपन करता येईल. पण काहींना असेही वाटते की श्रीमंत होणे (Earn Money) अशक्य आहे. करोडपती होणे प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेले नसते. मात्र, असे अजिबात नाही. जर तुम्ही प्रयत्न केले तर तुमची स्वप्ने नक्कीच पूर्ण होऊ शकतात. (Personal Finance)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड सीप मध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. एसआयपीद्वारेही छोटी रक्कम गुंतवता येते. दीर्घकालीन एसआयपीमध्ये चक्रवाढीचा लाभ मिळतो.

 

बचत आणि गुंतवणूक
करोडपती होण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला बचत करावी लागेल. नियमित बचत केल्याने तुम्हाला बचत करण्याची सवय लागेल. जेव्हा तुम्ही नियमित बचत करत असाल, तेव्हा ही बचतही दरवर्षी वाढवावी लागेल. ज्या प्रमाणात महागाई आणि तुमचे उत्पन्न वाढते, त्याच प्रमाणात तुम्ही तुमची मासिक बचत देखील वाढवली पाहिजे. आता ही बचत गुंतवत राहा. अशा प्रकारे तुम्ही मोठा फंडा बनवू शकता. (Personal Finance)

 

तुम्ही वयाच्या 21व्या वर्षापासून दररोज फक्त 100-100 रुपये गुंतवल्यास आणि दर महिन्याला एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही निवृत्तीपूर्वी करोडपती होऊ शकता. (Money Making Investment Tips)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

100 रुपये ते 1 कोटी प्रवास
जर तुम्ही वयाच्या 21 व्या वर्षापासून दररोज 100 रुपये वाचवत असाल आणि म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये
दरमहा 3,000 रुपये गुंतवले तर आतापर्यंतचा रेकॉर्ड सांगतो की म्युच्युअल फंड (Mutual Funds) दरवर्षी 12 टक्क्यांहून जास्त रिटर्न देतो.
अशा प्रकारे, जर तुम्ही वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत म्हणजेच 30 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्ही 1.1 कोटी रुपयांचा निधी तयार करू शकता.

 

30 वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक सुमारे 11 लाख रुपये असेल. तर, यावरील रिटर्न सुमारे 95 लाख रुपये असेल.

 

 Web Title :- Personal Finance | money making investment tips crorepati kaise bane how to become millionaire

 

हे देखील वाचा :

TET Exam Scam | TET घोटाळ्यात कारवाई ! पैसे भरून शिक्षक झालेल्या 7,800 जणांची यादी तयार; बोगस शिक्षकांवर कारवाईची शक्यता

Maharashtra Crime News | दहा दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

Pune Crime | ‘मी इथला भाई आहे’ म्हणत सराईत गुंडाचा वारजे माळवाडीत ‘राडा’; तरुणावर कोयत्याने वार

 

Related Posts