IMPIMP

Maharashtra Crime News | दहा दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

by nagesh
Building slab collapses in Ulhasnagar 4 people died due to slab collapse in Ulhasnagar

लातूर : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Crime News | हंडरगुळी (ता. उदगीर ) Hali Handarguli-Udgir येथील २७ वर्षीय तरुण गेल्या १० दिवसापासून बेपत्ता (Missing) होता. अखेर सोमवारी सायंकाळी परिसरातील तिरु मध्यम प्रकल्पात त्याचा मृतदेह (Maharashtra Crime News) आढळून आला आहे. गणेश पांडुरंग दापके (Ganesh Pandurang Dapke) असे या तरुणाचे नावआहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, वडील पांडुरंग बाजीराव दापके (Pandurang Bajirao Dapke) यांनी वाढवणा (बु.) पाेलीस ठाण्यात (Wadhwana Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी सहा जणांविराेधात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. विजय शिवाजी हंगरगे (Vijay Shivaji Hungarage), बालाजी शिवाजी हंगरगे (Balaji Shivaji Hungarage), सुभाष गोविंद हंगरगे (Subhash Govind Hungarage), संतोष गोविंद हंगरगे (Santosh Govind Hungarage), त्र्यंबक दिगंबर घोगरे (Tryambak Digambar Ghogre) (सर्व रा. हंडरगुळी ता. उदगीर) आणि विजय हंगरगे (Vijay Hungarage) याचा साडू बाळू (रा. घोणसी ता.जळकोट) अशी त्यांची नावे आहेत.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या दहा दिवसापासून गणेश दापके हा बेपत्ता होता. रविवारी ( दि ६) त्याचा विवाह साेहळा हाेता. मात्र तत्पूर्वीच तो बेपत्ता झाल्याने दापके कुटूंब हादरून गेले होते. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. त्यानंतर १ फेब्रीवारीला तो बेपत्ता झाल्याची तक्रार वाढवणा पाेलीस ठाण्यात दाखल करण्यात आली हाेती. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी वडील पांडुरंग दापके यांचा जबाब नोंदवला. त्यात त्यांनी गणेशबरोबर झालेल्या मागील भांडण्याच्या तक्रारीवरून जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करुन, त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तिरू प्रकल्पात टाकला असा संशय ६ जणांविरोधात व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल (Maharashtra Crime News) केला आहे.

सहायक पाेलीस निरीक्षक नौशाद पठाण (Assistant Police Inspector Naushad Pathan) म्हणाले की, गणेश दापके याचा रविवारी विवाह होणार होता.
तत्पूर्वीच तो बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांना धक्का बसला होता.
त्याचा शोध सुरु असतानाच साेमवारी सायंकाळच्या सुमारास तिरु मध्यम प्रकल्पात (Thiru Medium Project) त्याचा मृतदेह आढळून आला.
त्याच्या कुटूंबियांनी खुनाचा संशय व्यक्त केला असून त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
या प्रकरणी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra Crime News | the dead body of a young man who had been missing for eight to ten days was found Hali Handarguli Udgir Latur Crime News

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘मी इथला भाई आहे’ म्हणत सराईत गुंडाचा वारजे माळवाडीत ‘राडा’; तरुणावर कोयत्याने वार

Pune Water Supply | वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम; पुण्यासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा विस्कळीत

Pune Corporation | वारजे येथे बांधा- वापरा व हस्तांतरीत करा तत्वावर 300 बेडस्चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

 

Related Posts