IMPIMP

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार? सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

by nagesh
Petrol Diesel Price | good news petrol diesel prices will decrease common people will get relief

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेले पाच महिने पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. भारत सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोलच्या दरात शेवटचे बदल केले होते. तेव्हा वाढती महागाई पाहता पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आठ रुपयांनी तर, डिझेलच्या उत्पादन शुल्क (Petrol Diesel Price) सहा रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण देशातील पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, डिसेंबरमध्ये यामध्ये आणखी कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

सध्या कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड घटल्या आहेत. मे मध्ये कच्च्या तेलाची किंमत जवळपास 110 डॉलर्स प्रति बॅरेल होती. बॅरेलची किंमत आता कमी होऊन 75 ते 80 डॉलर्सच्या कक्षेत आली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दरही (Petrol Diesel Price) कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी होण्यामागे चीनमधील लॉकडाउन कारणीभूत आहे. कोरोना साथीमुळे चीनमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील उद्योग आणि व्यवसाय बंद होऊन इंधनाची मागणी घटली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती उतरत आहे. त्यामुळे तेल कंपन्या इंधनदरात कपात करु शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गेल्या पाच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
शिवाय रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून भारत रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल विकत घेत आहे.
त्यामुळे आता या कमी किंमतींचा फायदा सर्वसामान्यांना झाला पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, 1 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 115 रुपयांची घट झाली होती.
मात्र याचा फायदा घरघुती गॅस ग्राहकांना झाला नाही.

 

Web Title :- Petrol Diesel Price | good news petrol diesel prices will decrease common people will get relief

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘छत्रपतींचे वंशज हे कधीच हतबल होऊ शकत नाहीत, उदयनराजेंच्या पाठीशी आम्ही कायम आहोत’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

Pune Pimpri Crime | भोसरीत भरदिवसा शाळकरी मुलीचा विनयभंग, आरोपी गजाआड

Kajol-Karan Johar | आता काजोल साकारणार ‘या’ स्टारकीडच्या आईची भूमिका; कयोज इराणी करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

 

Related Posts