IMPIMP

Pune Pimpri Crime | भोसरीत भरदिवसा शाळकरी मुलीचा विनयभंग, आरोपी गजाआड

by nagesh
Sexual Assault

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Pimpri Crime | शाळेत जाणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलून तिचा विनयभंग केल्याची घटना भोसरी मध्ये घडली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) गणेशनगर येथील बसस्टॉप जवळ सोमवारी (दि.28) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 33 वर्षाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

 

दिनेशकुमार साधुराम (वय-33 रा. गवळी माथा, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय-35) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 354, 354 (अ), पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेत जाण्यासाठी गणेशनगर येथील बसस्टॉप येथे आली होती.
त्यावेळी आरोपी मुलीचा पाठलाग करत बसस्टॉपवर आला. त्याने मुलीसोबत अश्लील बोलून तिच्यासोबत गैरवर्तन केले.
मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Molestation Case MIDC Bhosari Police Station

 

हे देखील वाचा :

Kajol-Karan Johar | आता काजोल साकारणार ‘या’ स्टारकीडच्या आईची भूमिका; कयोज इराणी करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

PCMC Rapido | पिंपरी चिंचवडमध्ये ‘रॅपिडो’ला ब्रेक, RTO कडून गुन्हा दाखल

Sunny Waghchoure-Golden Boy | बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅनला टक्कर देण्यासाठी पुण्याचा गोल्डन बॉय घेणार एंट्री

Chitra Wagh On Sushma Andhare | ‘आमची नावे घेऊन सुषमा अंधारेंचे दुकान चालू आहे’ – चित्रा वाघ

 

Related Posts