IMPIMP

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरात आजही वाढ; वर्षाअखेरपर्यंत भाववाढ सुरुच राहण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर

by nagesh
IPS Atulchandra Kulkarni | ips atulchandra kulkrani is appointed as additional director of general in national investigation agency

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol Diesel Price Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरातील भाववाढ काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात (Petrol Diesel Price Pune) आली आहे.

पेट्रोलच्या दरात आज प्रति लिटर ३४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात आज पेट्रोलचा दर ११४.२८ रुपये लिटर इतका झाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने या वर्षाअखेरपर्यंत ग्राहकांना कोणताही दिलासा मिळण्याची सध्या तरी शक्यता दिसून येत नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

पेट्रोलबरोबरच डिझेलच्या दरात लिटरमागे ३६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
पुण्यात आज डिझेलचा दर १०३.७१ रुपये लिटर झाला आहे.
पॉवर पेट्रोलच्या दरातही लिटरमागे ३४ पैशांनी वाढ झाली आहे.
पॉवर पेट्रोलचा दर आता ११७.९६ रुपये लिटर झाला आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा दर सध्या प्रतिबॅरल ८५ रुपये डॉलर झाला आहे.
त्याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत असल्याने कच्च्या तेलाच्या दरात एका डॉलरने जरी वाढ झाली
तरी त्याचा भारतीय चलनात जवळपास ७५ रुपयांचा फरक पडत आहे. त्यामुळे तेल कंपन्या दररोज पेट्रोल,
डिझेलच्या दरात भाववाढ करताना दिसत आहे. यापुढील काळात कच्च्या तेलाचे दर असेच वाढण्याची शक्यता असल्याने
नववर्षाच्या प्रारंभापर्यंत तरी ग्राहकांची या भाववाढीतून सुटका होण्याची शक्यता दिसून येत नाही.

 

Web Title :- Petrol Diesel Price Pune Today Saturday 30 oct 2021 rates

 

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 98 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,584 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 110 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts