IMPIMP

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,584 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus in Maharashtra | 5455 new patients of Corona in last 24 hours find out other statistics

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आली आहे. आजही राज्यात 1 हजार 338 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 584 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 47 लाख 038 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.55 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 36 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 170 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यात 18 हजार 465 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 24 लाख 39 हजार 900 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 09 हजार 292 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 68 हजार 338 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 908 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title :- Maharashtra State Coronavirus Update

 

हे देखील वाचा :

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 110 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

EPFO कडून ऐन दिवाळीत कर्मचार्‍यांच्या पदरी पुन्हा निराशा, PF वर पुन्हा जुनाच 8.5% व्याजदर कायम

PM Jan Dhan Yojana | PMJDY ला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, 44 कोटी झाली पीएम जनधन बँक अकाऊंटची संख्या

 

Related Posts