IMPIMP

Phone Pay | फोन पे वापरकर्त्यांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

by nagesh
Phonepe | now flipkart and phonepe are not one company separate two companies business

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – फोन पे’ (Phonepe) आणि ‘फ्लिपकार्ट’ या दोन्ही एकत्र व्यवसाय करत असलेल्या कंपन्यांनी वेगळे होण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. आता त्याची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, दोन्ही कंपन्या वेगळ्या झाल्या आहेत. परंतु, या दोन्ही कंपन्या ‘वॉलमार्ट’ या आपल्या पितृसंस्थेअंतर्गत काम करत राहतील. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. फोन पे (Phonepe) 2016 साली फ्लिपकार्ट समुहाने विकत घेतला होता.

 

आता फ्लिपकार्टपासून त्यांचे सर्व व्यवहार वेगळे केले आहेत. यामुळे या दोनही कंपन्यांना त्यांच्या व्यवसायाचे स्वातंत्र्य मार्ग तयार करता येणार आहेत. याबाबत फ्लिपकार्ट समुहाचे विशेष कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, की आम्हाला खात्री आहे की, फोन पे लाखो भारतीयांना आर्थिक सुविधा प्रदान करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करत राहील.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फ्लिपकार्ट आणि फोन पे (Phonepe) या दोन्ही कंपन्यांची पितृसंस्था अमेरिकेतील वॉलमार्ट ही रिटेल कंपनी आहे.
ती यापुढेही अस्तित्वात राहणार आहे. कारण दोन्ही कंपन्यांमध्ये वॉलमार्ट ही कंपनी मोठी भागधारक आहे.
या व्यवहाराचा एक भाग म्हणून, वॉलमार्टच्या नेतृत्वाखाली फ्लिपकार्ट सिंगापूर आणि फोन पे सिंगापूरच्या
सध्याच्या भागधारकांनी थेट फोन पे इंडियाचे शेअर्स खरेदी केले आहेत. वॉलमार्ट कंपनीने 2018 साली
फ्लिपकार्ट कंपनीमधला 77 टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतला होता.
तेव्हा फोन पे ही कंपनी फ्लिपकार्ट समूहाचा भाग झाली होती.

 

 

Web Title :- Phonepe | now flipkart and phonepe are not one company separate two companies business

 

हे देखील वाचा :

PSI Death Due To Heart Attack | दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Deepak Kesarkar | संजय राऊत यांच्या चौकशीच्या मागणीला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Honey Singh | आता गायक हनी सिंगने पठाण चित्रपटातील गाण्याबद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य

 

Related Posts