IMPIMP

PM Jan-Dhan Account मध्ये जमा रक्कमेबाबत मोठे अपडेट, जाणून घ्या काय सांगतात Finance ministry चे हे आकडे

by nagesh
PM Jan-Dhan Account | big update about the amount deposited in pm jan dhan account know about figures of the finance ministry

नवी दिल्ली : वृत्त संस्था PM Jan-Dhan Account | सर्वसामान्य जनता आणि गरीब लोकांना बँकेशी जोडण्यासाठी आणि योजनांचा लाभ देण्यासाठी 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत लोकांना दोन लाखांचा विमा आणि ओव्हरड्राफ्टचा लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत लोकांना इतरही अनेक फायदे दिले जातात. त्यामुळे आतापर्यंत करोडो लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. (PM Jan-Dhan Account)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने एक मोठे अपडेट जारी केले आहे. पंतप्रधान जन-धन खाते (PMJDY) अंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांमधील ठेवींनी 1.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचे अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

अर्थ मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये 44.23 कोर्टीहून अधिक प्रधानमंत्री जनधन योजना खात्यांमधील एकूण शिल्लक 1,50,939.36 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, असे पीटीआयच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शिष्यवृत्ती, सबसिडी, पेन्शन आणि कोविड रिलीफ फंड यांसारखे फायदे या खात्यांमधील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे बँक खात्यांमध्ये जमा केले जातात. (PM Jan-Dhan Account)

 

 

कोणत्या बँकांमध्ये किती खाती?

अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एकूण 44.23 कोटी खात्यांपैकी 34.9 कोटी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, 8.05 कोटी प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये आणि उर्वरित 1.28 कोटी खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये आहेत. तसेच, 31.28 कोटी लाभार्थ्यांना रुपे डेबिट कार्ड जारी करण्यात आले.

ही कार्डे वापरली जात असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, ग्रामीण आणि निमशहरी बँक शाखांमध्ये 29.54 कोटी जनधन खाती आहेत. 29 डिसेंबर 2021 पर्यंत सुमारे 24.61 कोटी खातेदार महिला होत्या. योजनेच्या पहिल्या वर्षात 17.90 कोटी जनधन खाती उघडण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खात्यात किती शिल्लक असावी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्देशानुसार या खात्यांमध्ये शिल्लक ठेवण्याची मर्यादा नाही.
खात्यात शून्य शिल्लक असली तरीही तुमचे खाते सुरू राहील.
8 डिसेंबर 2021 पर्यंत, एकूण शून्य शिल्लक खात्यांची संख्या 3.65 कोटी होती, जी एकूण जनधन खात्यांच्या सुमारे 8.3 टक्के आहे.

 

 

ही योजना कोणत्या सेवा प्रदान करते?

PMJDY ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती आणि त्याचवेळी आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी 28 ऑगस्ट 2014 रोजी लाँच करण्यात आली होती.
लोकांना आर्थिक सुविधा सहज मिळाव्यात म्हणून हे खाते सुरू करण्यात आले.
या सेवांमध्ये बँकिंग, रेमिटन्स, क्रेडिट, विमा, पेन्शन इत्यादींचा समावेश आहे.

 

 

Web Title : PM Jan-Dhan Account | big update about the amount deposited in pm jan dhan account know about figures of the finance ministry

 

हे देखील वाचा :

UCO Bank New Debit Card | युको बँकेच्या नवीन कार्डने 2 लाखांपर्यंतची खरेदी करा, मोफत आरोग्य तपासणीचाही लाभ घ्या

PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान योजनेचे पैसे ‘या’ शेतकऱ्यांना परत करावे लागणार; जाणून घ्या

Pune Corona Updates | अत्यंत चिंताजनक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4857 नव्या रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts