IMPIMP

PMC News | महापालिका प्रशासनाचा कारभार गतिमान करण्यासाठी प्रत्येक विभागात माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजासाठी ‘नोडल ऑफीसर’ नेमणार

by nagesh
Pune PMC News | Strict enforcement of plastic bag ban! On the first day itself, PMC took action against 14 traders and seized 391 KG plastic bags Single Use Plastic Ban

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन PMC News | माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संपुर्ण शहराचे व्यवस्थापन करणार्‍या पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनाच्या कामकाजातही दिवसेंदिवस माहिती तंत्रज्ञानाचा (Information Technology) वापर वाढत आहे. एवढेच नव्हे तर विविध सुविधा देखिल महापालिका ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे. प्रशासनातील विविध विभागांच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजाचा व्याप वाढत असल्याने सर्व विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागात या कामांसाठी ‘नोडल ऑफीसर’ (Nodal Officer) नेमण्याचे आदेश दिले आहेत. (PMC News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महापालिकेच्या सर्वच विभागांचे कामकाज संगणकावरच होत आहे. दैनंदीन कामात सुलभता आणि पारदर्शकतेसोबत गतिमानता यावी यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाअधिक वापर महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. परंतू यानंतरही केवळ जबाबदारी निश्‍चित नसल्याने तसेच माहिती तंत्रज्ञानाचे पुरेसे ज्ञान नसल्याने अनेकदा त्रुटी राहून जातात. यामुळे अगदी वेबसाईट अपडेट न होणे, तक्रार निवारण प्रणालीवरील तक्रारींचा पाठपुरावा न होणे, केलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अहवाल नसणे अशा गोष्टींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. (PMC News)

 

 

या पार्श्‍वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (PMC Deputy Commissioner Sachin Ithape)
यांनी माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजामध्ये समन्वय राखण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्या
नोडल ऑफीसरची नियुक्ती करण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.
या नोडल ऑफीसरने महापालिकेच्या संकेतस्थळावर आपल्या विभागाची माहिती अद्ययावत करणे,
आपले सरकार, पी.जी.पोर्टल, पीएमसी केअर या तक्रारींसाठीच्या पोर्टलवर येणार्‍या तक्रारीं संबधित अधिकार्‍याच्या आदेशानुसार निरस्त करणे,
विभागामार्फत वापरण्यात येणार्‍या प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास माहिती व तंत्रज्ञान विभागाशी संपर्क साधून दूर करणे,
आपल्या विभागाचे सर्व मासिक व अन्य अहवाल प्रणालीमध्ये भरणे व संगणक विषयक अन्य कामांसाठी समन्वय साधण्याची जबाबदारी
या नोडल ऑफीसरवर राहाणार आहे. सर्व विभागांनी १८ मेपर्यंत माहिती व तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्या दोन सेवकांची
आयटी नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती करावी, असे इथापे यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title :- PMC News | To speed up the administration of the Pune Municipal Corporation, a ‘Nodal Officer’ will be appointed in each department for the work of Information and Technology

 

हे देखील वाचा :

PM Shram Yogi Maandhan | सरकारकडून दरमहिना घ्यायची असेल 3,000 रुपये पेन्शन तर लवकर ‘या’ योजनेत करा रजिस्ट्रेशन

Pune Riverfront Development | मुळा-मुठा नदी सुधार आणि नदीकाठ सुधार योजनेवर चर्चा करण्यासाठी CM ठाकरे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत लवकरच बैठकीचे आयोजन – खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण

Shivsena Vaibhav Wagh | शिवसेनेकडून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभारी समन्वयकपदी वैभव वाघ यांची नियुक्ती

 

Related Posts