IMPIMP

Pune Riverfront Development | मुळा-मुठा नदी सुधार आणि नदीकाठ सुधार योजनेवर चर्चा करण्यासाठी CM ठाकरे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत लवकरच बैठकीचे आयोजन – खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण

मेट्रो केल्यानंतरही बालभारती- पौड रस्ता बोगद्याचा अट्टाहास कशासाठी ? पर्यावरण प्रेमींचा सवाल

by nagesh
Pune Riverfront Development | A meeting will be held soon in the presence of CM Thackeray and Sharad Pawar to discuss the Mula-Mutha river improvement and river bank improvement scheme Adv. Vandana Chavan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Riverfront Development | नदी सुधार आणि नदीकाठ सुधार योजनेला विरोध नाही. परंतू या योजनांबाबत महापालिका प्रशासनाने (PMC Administration) दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत चर्चा होणार असल्याची माहिती खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण (MP Adv. Vandana Chavan) यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मेट्रो (Pune Metro) मार्ग सुरू करताना बालभारती-  पौड फाटा बोगद्याची गरज भासणार नाही, असे महापालिकाच Pune Municipal Corporation (pmc) म्हणत असेल तर पर्यावरणाचा र्‍हास करून बोगदा करण्याचा अट्टाहास करू नये, असे मतही अ‍ॅड. चव्हाण आणि पर्यावरण प्रेमी प्रदीप भुमरे (Environmentalist Pradeep Bhumare) यांनी व्यक्त केले. (Pune Riverfront Development)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अ‍ॅड. चव्हाण यांनी सांगितले, की नदी काठ सुधार योजनेतील त्रुटी विशेषत: पावसाचे प्रमाण वाढत असताना मुळा – मुठा नद्यांना येणार्‍या पूरामध्ये वाढ होणार आहे. याचा विचार नदीकाठ सुधार योजना राबविताना करण्यात आलेला नाही (Mula Mutha River Development Project). ही बाब अभ्यासकांनी लक्षात आणून दिल्यानंतर शरद पवार, पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत समिती स्थापन करून दोनवेळा बैठका झाल्या. बैठकीमध्ये उपस्थितीत केलेल्या प्रश्‍नांवर महापालिका प्रशासन समाधानकारक उत्तर देउ शकलेली नाही. यामुळे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या उपस्थित बैठक घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नदी सुधार व नदीकाठ सुधार योजनांना (Pune River Bank Improvement Schemes) विरोध असायचे कारण नाही. परंतू भविष्याचा विचार करून सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आताच उपाययोजना कराव्यात, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. (Pune Riverfront Development)

 

 

बालभारती – पौड रस्ता (Balbharati – Paud Road) जोडणार्‍या वेताळ टेकडी बोगद्याबाबत बोलताना प्रदीप भुमरे यांनी सांगितले, की महापालिकेच्या विकास आराखड्यात (PMC Development Plan) तीन बोगदे सुचविण्यात आले आहेत. परंतू प्लॅनिंग कमिटीने हे बोगदे निरुपयोगी ठरविले असून त्याची १२ कारणेही स्पष्ट केली आहेत. परंतू २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांवर हे बोगदे लादले आहेत. मुळातच विकास आराखड्यात बोगद्यांचा समावेश करण्यापुर्वी प्रिफिजिबिलीटी रिपोर्ट तयार करणे गरजेचे असताना ते काम आता सुरू करण्यात आले आहे. विशेष असे की यासाठी सल्लागार नेमण्याची निविदा सहा वेळा काढून सुरवातीला अपात्र ठरलेल्या सल्लागारालाच देण्यात आली आहे. कर्वे रस्त्यावर वनाजपर्यंत मेट्रो मार्ग आहे, तसेच शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्ग करण्यात येत असून आणखी ५०० ई बसेसही घेण्यात येणार आहेत. रस्ते विकसित केले की खाजगी वाहनांचीच संख्या वाढत जाणार असून याचा फटका मेट्रो आणि बस संचलनालाही होणार आहे, असेच मेट्रोच्या आराखड्यात नमूद असताना पर्यावरणाचा र्‍हास करणारे बोगदे करण्याचा अट्टाहास करू नये, ही आमची भुमिका आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नदी सुधार व नदीकाठ सुधार प्रकल्पांच्या माहितीसाटी १६ मे रोजी नागरिकांसाठी चर्चासत्राचे आयोजन

नदी सुधार व नदीकाठ सुधार प्रकल्पांबाबत नागरिकांच्या अनेक शंका आहेत.
शहरात राबविल्या जाणार्‍या अशा महत्वाच्या प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसल्याने शंका निर्माण होतात.
जनजागृतीबाबत महापालिका फारसे प्रयत्न करत नसल्यानेच प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर त्यातील त्रुटी समोर येत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
नदी सुधार व नदी काठ सुधार योजनेबाबत येत्या १६ मे रोजी आयएमए च्या सभागृहामध्ये चर्चासत्र आयोजित केले आहे.
यावेळी महापालिकेचे अधिकारी देखिल उपस्थित राहणार असून ते प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत.
नागरिकांना किमान प्रकल्प काय आहे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे व त्यांच्या सूचना जाणून घेणे हा चर्चासत्र आयोजित करण्यामागचा उद्देश आहे.
या चर्चासत्राला नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी केले.

 

त्यापुर्वी आम्ही आय. एम. ए च्या सभागृहात चर्चासत्र घेतले आहे. तेथे पालिका प्रेझेन्टेशन करणार आहे.
स्वयंसेवी संस्था आणि प्रामुख्याने नागरिक त्यांच्या शंका, सूचना व्यक्त करतील.
किमान नागरिकांना प्रकल्प काय आहे, काय करायला हवे हे तरी नागरिकांच्या पर्यंत पोहोचेल असे आम्हाला वाटते.

 

 

Web Title :- Pune Riverfront Development | A meeting will be held soon in the presence of CM Thackeray and Sharad Pawar to discuss the Mula-Mutha river improvement and river bank improvement scheme Adv. Vandana Chavan

 

हे देखील वाचा :

Shivsena Vaibhav Wagh | शिवसेनेकडून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभारी समन्वयकपदी वैभव वाघ यांची नियुक्ती

PPF Investment | E-E-E कॅटेगरीमध्ये गुंतवणूक डबल करण्याची ट्रिक, व्याज सुद्धा मिळेल दुप्पट; जाणून घ्या कसा होईल फायदा

Green Chilli Benefits | वजन कमी करण्यासाठी हिरवी मिरची करते मदत; जाणून घ्या

 

Related Posts