IMPIMP

PM Shram Yogi Maandhan | सरकारकडून दरमहिना घ्यायची असेल 3,000 रुपये पेन्शन तर लवकर ‘या’ योजनेत करा रजिस्ट्रेशन

by nagesh
PM Shram Yogi Maandhan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Shram Yogi Maandhan | असंघटित क्षेत्रातील मजूर आणि कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी मोदी सरकारने
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Maandhan) सुरू केली आहे. 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेत आतापर्यंत
46.66 लाख लाभार्थी सहभागी झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगार व मजूरांना दरमहा पेन्शनची सुविधा दिली जाते. ही योजना 25 ते 36 वयोगटातील कामगारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे या योजनेत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. यामध्ये सामील होणार्‍या लाभार्थ्यांना नाममात्र रक्कम जमा करून दरमहा 3,000 रुपये किंवा वयाच्या 60 वर्षांनंतर वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळू शकते. (PM Shram Yogi Maandhan)

 

योजनेत कोण होऊ शकतात सामील

या योजनेत सामील होण्यासाठी सर्वात महत्त्वाची वयोमर्यादा आहे, जी 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 40 वर्षांपेक्षा कमी असावी. याशिवाय असंघटित क्षेत्रात काम करणारा कोणताही कामगार या योजनेत सामील होऊ शकतो, फक्त त्याचा मासिक पगार 15 हजारांपेक्षा जास्त नसावा. या योजनेंतर्गत निवृत्तीच्या वयानंतर फारच कमी रक्कम जमा करून पेन्शनच्या स्वरूपात मोठी रक्कम मिळते.

 

योजना कशी करते काम

योजनेत सामील होणार्‍या कामगारांच्या वयानुसार योगदान घेतले जाते. जर 18 वर्षांची व्यक्ती या योजनेत सामील झाली तर त्याला 3,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. जर एखाद्या व्यक्तीचे वय 29 वर्षे असेल तर त्याला पेन्शन मिळण्यासाठी वयाच्या 60 वर्षापर्यंत दरमहा 100 रुपये जमा करावे लागतील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याशिवाय, वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सहभागी झाल्यास, 60 वर्षे वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 200 रुपये जमा करावे लागतील. या योजनेची विशेष बाब म्हणजे तुम्ही जेवढे पैसे जमा करता, तेवढीच रक्कम सरकार जमा करते.

 

पुरुषांपेक्षा महिलांची नोंदणी जास्त

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांची नोंदणी पुरुषांपेक्षा जास्त आहे. योजनेचा लाभ घेणार्‍या पुरुषांची संख्या 19,23,231 असून महिलांची एकूण संख्या 21,56,763 वर पोहोचली आहे. या लाभार्थ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर सरकारकडून दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळेल. यामध्ये 21 लाखांहून अधिक लाभार्थी 26 ते 35 वयोगटातील आहेत.

 

योजनेसाठी कसा करावा अर्ज

योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी, अर्जदाराला आधार कार्ड, बँक पासबुक,
मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रांसह प्रथम जवळच्या लोकसेवा केंद्रात (पीएससी) जावे लागेल.
येथे, पीएससी एक्झिक्युटिव्हकडे कागदपत्रे सबमिट केल्यानंतर, एजंट फॉर्म भरेल.
यानंतर, तुमचा अर्ज श्रम योगी योजनेअंतर्गत पूर्ण होईल,
परंतु फॉर्मची प्रिंटआउट भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.

 

Web Title :- PM Shram Yogi Maandhan | how to enroll with pm shram yogi maandhan yojna to get 3000 rupee monthly pension

 

हे देखील वाचा :

Pune Riverfront Development | मुळा-मुठा नदी सुधार आणि नदीकाठ सुधार योजनेवर चर्चा करण्यासाठी CM ठाकरे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत लवकरच बैठकीचे आयोजन – खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण

Shivsena Vaibhav Wagh | शिवसेनेकडून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभारी समन्वयकपदी वैभव वाघ यांची नियुक्ती

PPF Investment | E-E-E कॅटेगरीमध्ये गुंतवणूक डबल करण्याची ट्रिक, व्याज सुद्धा मिळेल दुप्पट; जाणून घ्या कसा होईल फायदा

 

Related Posts