IMPIMP

PMPML Bus Supply Contractors Strike | पुणेकर वेठीस ! पीएमपीएमएलच्या बस पुरवठादार ठेकेदारांचा संप; शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम

by nagesh
Pune PMPML Bus News | PMPML bus service on 2 new routes Kothrud Stand to Hinjewadi Maan Phase-3 and Sangvi Gaon to Symbiosis Hospital Lavale, Know Route

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन PMPML Bus Supply Contractors Strike | पुणे पीएमपीएमएलच्या बस ठेकेदारांनी काल मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. खरंतर पीएमपी प्रशासनाला (PMPML Administration) कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आलेली नव्हती. मागील काही महिन्यापासून पीएमपी बस ठेकेदारांची बिले थकली होती. त्यामुळे ठेकेदार पीएमपीकडे बिलांची मागणी करत होते. यावरुन पीएमपी प्रशासनाकडून काल (गुरूवारी) ठेकेदारांची थकीत 58 कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. दरम्यान त्यानंतरही ठेकेदारांनी संप पुकारला आहे. (PMPML Bus Supply Contractors Strike)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ठेकेदारांच्या संपामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. पीएमपीच्या 1400 ते 1500 बस मार्गावर असतात त्यापैकी 650 बस ठेकेदारांच्या आहेत. त्यामध्ये इत्यादी बसचा देखील समावेश आहे. दरम्यान, कर्मचा-यांच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) अथवा इतर कोणतीही सुविधा दिली जात नाही, या पार्श्वभूमीवर ठेकेदारांच्या बस चालकांनी पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा (IAS Laxminarayan Mishra) यांच्याकडे ठेकेदारांबाबत तक्रार दिली होती.

यानुसार, लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सर्व रेकॉर्ड तपासण्याचा आदेश दिला होता. या विषयात पीएमपी प्रशासनाने लक्ष घालू नये, यासाठी ठेकेदारांनी दबाव तंत्राचा अवलंब केल्याचा पीएमपी प्रशासनाचा दावा आहे.

 

 

Web Title :  PMPML Bus Supply Contractors Strike Disrupted Pune Citys Public Transport System

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Pune NCP | ॲड. गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा; पुणे राष्ट्रवादीची मागणी

Talegaon Chakan Highway Accident | खड्डा चुकवण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव; थेट टँकरखाली चिरडला

 

Related Posts