IMPIMP

Pooja Chavan Suicide Case : ‘2-3 दिवसात माझी हत्या होण्याची शक्यता !’

by sikandershaikh
pooja-chavan-case-shantabai-rathod

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) मध्ये दिवसेंदिवस नवीन खुलासे होताना दिसत आहेत. यावरून आता राजकारण चांगलंच तापत आहे. मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजाच्या आईवडिलांना 5 कोटी रुपये पोहोचवले आहेत असा धक्कादायक आरोप पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड (Shantabai Rathod) यांनी केला होता. या आरोपानंतर मंगळवारी लहू चव्हाण यांनी  शांताबाई यांच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शांताबाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आता 2-3 दिवसात माझी देखील हत्या होण्याची शक्यता मला वाटत आहे असं त्या म्हणाल्या.

‘2-3 दिवसात माझी देखील हत्या होण्याची शक्यता मला वाटत आहे’

गुन्हा दाखल झाल्यानंतर शांताबाई राठोड (shantabai rathod) म्हणाल्या, स्वत:च्या लेकरासाठी तुम्ही न्याय मागण्यासाठी गेला नाहीत. तुम्ही माझे रक्ताचे नातेवाईक आहात. माझ्या विरोधात तक्रार दाखल झाली हे चुकीचं आहे. आता 2-3 दिवसात माझी देखील हत्या होण्याची शक्यता मला वाटत आहे. त्यामुळं माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवावा असं आवाहन शांताबाई यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना केलं आहे.

तक्रारीत काय म्हणाले लहू चव्हाण ?

दरम्यान पूजाचे वडिल लहू चव्हाण यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं की,
शांताबाई राठोड यांनी आपल्या कुटुंबीयांवर 5 कोटी घेतल्याचे केलेले आरोप चुकीचे आणि खोटे आहेत.
केवळ आपल्या कुटुंबाची बदनामी करण्याचं कारस्थान शांताबाई राठोड यांनी रचलं आहे.
त्यांच्याविरुद्ध कलम 500, 501, 502 व कलम 66 (अ) आयटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करावी असं म्हटलं आहे.

Related Posts