IMPIMP

Prabhakar Bhave Passed Away | ज्येष्ठ रंगभूषाकार काळाच्या पडद्याआड ! पुण्यातील कलावंतांच्या चेहर्‍याला सर्वप्रथम रंग लावणारे प्रभाकर भावे यांचे निधन

by nagesh
Prabhakar Bhave Passed Away | Makeup Artist Prabhakar Bhave Passed Away At 78 In Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Prabhakar Bhave Passed Away | चेहर्‍याला केवळ रंग लावणे म्हणजे रंगभूषा नाही, तर भूमिकेनुसार रंगाचा वापर करणे आणि त्यासाठी कमीत कमी रंग वापरणे महत्वाचे असते. रंगाचा अतिरेक झाला तर नाटक फसते, अशी धारणा बाळगणारे ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे (वय ७८) यांचे (Prabhakar Bhave Passed Away) आज पहाटे पुण्यात निधन झाले. ते ब्रेनट्युमरच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांचा एक एक अवय निकामी होत गेले. शुक्रवार पेठेतील मुलीच्या घरी त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Makeup Artist Prabhakar Bhave Passed Away In Pune)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुण्यातील जवळपास सर्व अभिनेते, अभिनेत्री यांची सर्वप्रथम रंगभूषा करण्याचे श्रेय प्रभाकर भावे यांना जाते. पुरुषोत्तमपासून राज्य नाट्य, कामगार नाट्य अशा विविध नाट्यस्पर्धेतील कलाकारांची रंगभूषा करण्याचे काम ते ५ दशकाहून अधिक काळ करत होते. महाराष्ट्रातील सर्व नावाजलेल्या नाट्य स्पर्धांशी ते रंगभूषाकार म्हणून संबंधित होते. मुखवटे तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. रंगभूषा नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले असून पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. या पुस्तकाला राज्य सरकारचा त्या वषीर्चा उत्तम साहित्यकृतीचा पुरस्कार देखील मिळाला होता. चांगला रंगभूषाकार होण्यासाठी चित्रकला आणि शिल्पकलांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच वाचनाची गोडीही हवी. त्याशिवाय, रंगांच्या माध्यमातून ‘कॅरॅक्टर’ उभं करता येत नाही; पण ‘कॅरॅक्टर’ नुसार योग्य रंगभूषा करता आली तर कलाकार खुलतो. त्याचा परिणाम अभिनयावर होतो. म्हणून मला रंगभूषा हा नटाला खुलवणारा मानसोपचारच वाटतो, या भूमिकेतून भावे यांनी या क्षेत्राकडे पाहिलं. (Prabhakar Bhave Passed Away)

 

तरुण कलावंतांमध्ये रंगभूमीवरील ‘भावेकाका’ अशी ओळख असलेले प्रभाकर भावे हे अनेक वर्षे विविध
स्पर्धांमधील मुलांची रंगभूषा करीत़ मूळचे सातार्‍याचे असलेल्या भावेकाकांना लहानपणापासून नाटक, संगीत, साहित्याची आवड होती. परंतू सातारा मध्ये त्यांच्या कलेला पुरेसा वाव नसल्यानं ते पुण्यात आले आणि इथेच रमले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Prabhakar Bhave Passed Away | Makeup Artist Prabhakar Bhave Passed Away At 78 In Pune

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचे उर्फी जावेदबद्दल मोठे विधान; म्हणाल्या – ‘उर्फी जे करतेय, त्यात काहीच वावगं नाही’

Pune Crime News | इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार ! गरम पाण्याची पिशवी लिक झाल्याने रुग्ण भाजला, डॉक्टरांसह स्टाफवर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुण्यातील शाळांना CBSE मान्यतेचे बनावट प्रमाणपत्र प्रकरणात गुन्हा दाखल; समर्थ पोलीस ठाण्यात FIR

 

Related Posts