IMPIMP

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचे उर्फी जावेदबद्दल मोठे विधान; म्हणाल्या – ‘उर्फी जे करतेय, त्यात काहीच वावगं नाही’

by nagesh
Amruta Fadnavis | amruta devendra fadnavis on urfi javed and chitra wagh dispute

सरकारसत्ता ऑनलाईन  – Amruta Fadnavis | भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि ‘बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांचं ट्विटर वॉर थांबण्याचं नावच घेत नाही. उर्फी रस्त्यात फिरताना तोकडे कपडे घालते म्हणून तिला बेड्या ठोका अशी तक्रार चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) केली. त्यानंतर पुन्हा उर्फीने सोमवारी “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असं ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचलं. त्यानंतर तिने आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये तिने चारोळी टाकली आहे. “उर्फी की अंडविअर मे छेद है, चित्रा ताई ग्रेट है,” असं ट्वीट तिने केलं आहे. त्यात स्वतःच्याच अंतर्वस्त्राचा उल्लेख करत तिने चित्रा वाघ यांना ताई आणि महान अस म्हटलंय. त्यावर तिने तीन रेड हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. या वादावर अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Amruta Fadnavis)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमृता फडणवीस या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आहेत. त्या व्यावसायिक बँकर असण्यासोबतच एक सामाजिक कार्यकर्त्या आणि गायक देखील आहेत. नुकतेच अमृता फडणवीस यांचे ‘आज मैंने मूड बना लिया है’ हे गाने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. तसेच या गाण्याच्या लॉंच दरम्यान अमृता फडणवीस यांना अभिनेत्री उर्फी जावेदच्या वादाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की, मला आज यावर बोलायचे नाही. आज मी फक्त मैंने मूड बना लिया. यासोबतच सर्वांना विनंती आहे की तुम्हीदेखील या गाण्यावर डान्स करा… आणि उर्फीलादेखील डान्स करायला सांगा”. तसेच त्या हे देखील म्हणाल्या कि उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला काहीही वावगं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली. (Amruta Fadnavis)

 

चित्रा वाघ यांना जे वाटतंय, ते त्यांनी मांडले आहे त्यानुसार त्या कारवाई करत आहेत.
माझा विचार असा आहे की, उर्फीने जिथे प्रोफेशनल कमेंटमेंट नाही,
तिथे संस्कृतीच्या हिशोबाने राहिलं तर चांगलं आहे. बाकी मला वैयक्तिक सांगायचं झालं तर… उर्फीही एक स्त्री आहे,
ती जे काही करतेय. ते ती स्वत:साठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीही वावगं वाटत नाही,”
असे अमृता फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
आता उर्फी जावेदच्या नवीन ट्विटला चित्रा वाघ काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Amruta Fadnavis | amruta devendra fadnavis on urfi javed and chitra wagh dispute

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार ! गरम पाण्याची पिशवी लिक झाल्याने रुग्ण भाजला, डॉक्टरांसह स्टाफवर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुण्यातील शाळांना CBSE मान्यतेचे बनावट प्रमाणपत्र प्रकरणात गुन्हा दाखल; समर्थ पोलीस ठाण्यात FIR

NCP MLA Dattatray Bharne | पवारांचा पठ्ठ्या आहे, कोठून विकास निधी आणायचा ते मला माहिती – दत्तात्रय भरणे

 

Related Posts