IMPIMP

Prakash Ambedkar | महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड, प्रकाश आंबेडकर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

by nagesh
Prakash Ambedkar | prakash ambedkar met telangana chief minister k chandrasekhar

तेलंगणा : वृत्तसंस्था – विविध मुद्यांवरुन महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Political News) तापले आहे. तर दुसरीकडे राज्यात बीआरएस (BRS) ने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Telangana CM K Chandrasekhar Rao) यांची भेट घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारणात चर्चांना उधाण आणले आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) तेलंगणात दाखल झाले असून भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

https://www.facebook.com/photo?fbid=3043417202633322&set=pcb.3043417249299984

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 125 फूट उंचीच्या पुतळ्याचे लोकार्पण हैदराबाद येथे होणार आहे. या कार्यक्रमसाठी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हैदराबादमध्ये आले आहेत. असे असले तरी के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षाकडून महाराष्ट्रात पुढील निवडणूका समोर ठेवून या राजकीय घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि के चंद्रशेखर राव यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत (Shivsena) युती केली आहे. सेनेसोबत युती झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाने वंचित बहुजन आघाडीला अद्याप स्विकारले नाही. त्यामुळे हा वाद कायम असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळतील अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

 

Web Title :- Prakash Ambedkar | prakash ambedkar met telangana chief minister k chandrasekhar

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | मविआ सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद का दिले? जयंत पाटलांचा खुलासा म्हणाले-‘राजकारणात काही गोष्टी…’

Ambedkar Jayanti 2023 | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 25 हजार पुस्तके वाटप (Video)

Maharashtra Political News | ‘बावनकुळेंना त्यांच्या पक्षात किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार?’

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन संघाचा विजयी चौकार !!

 

Related Posts