IMPIMP

Maharashtra Political News | मविआ सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद का दिले? जयंत पाटलांचा खुलासा म्हणाले-‘राजकारणात काही गोष्टी…’

by nagesh
 Maharashtra Political News | why was ajit pawar given deputy cm post in mahavikas aghadi disclosure of jayant patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Maharashtra Political News | महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 च्या निवडणूक निकालानंतर (2019
Election Results) मोठी घडामोड घडली होती. या निवडणुकीत शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP Alliance) एकत्र लढले होते. मात्र, निकालानंतर
मुख्यमंत्रिपदावरुन (Maharashtra Political News) युती संपुष्टात आली. त्यानंतर काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना
(Shivsena) या वेगवेगळ्या विचारांच्या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तयार केली. त्यातच अचानक अजित पवार
(Ajit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत जात राज्यात पहाटेचा शपथ विधी (Morning oath Ceremony) सोहळा
पार पाडला. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अजित पवार यांनी कुणाच्या सांगण्यावरुन पहाटेचा शपथविधी केला? की ते स्वमर्जीने देवेंद्र फडणवीसांसोबत गेले अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजही गुलदस्त्यात आहेत. यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर अजित पवारांनी 72 तासांत सरकारमधून बाहेर पडत महाविकास आघाडीत पुन्हा परतले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर (Maharashtra Political News) त्यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री का केले याचा खुलसा राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे.

 

 

राजकारणात काही गोष्टी होत असतात

जयंत पाटील म्हणाले, पहाटेचा शपथविधी मी टीव्हीवर पाहिला. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मला फोन केला तेव्हा मी झोपेत होतो. राजकारणात काही गोष्टी होत असतात. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात. अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेत. काम करण्याचा अनुभव आहे. आक्रमक आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाला त्यांची गरज आहे. ते पुन्हा पक्षात आले त्यावेळी सर्वांनी बसून सगळ्या समस्यांचे निरसन केले. त्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद दिले, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.

 

 

काही प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात

जयंत पाटील पुढे म्हणाले, अजित पवार यांनी असे का केले हे सांगण्याची गरज नाही. आम्ही सर्वजण एकत्रित बसलो. पवारसाहेबांनी तो निर्णय घेतला. आमच्या सगळ्यांच्या वतीने अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. काही प्रश्नांची उत्तरे शोधायची नाहीत असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political News | why was ajit pawar given deputy cm post in mahavikas aghadi disclosure of jayant patil

 

हे देखील वाचा :

Ambedkar Jayanti 2023 | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 25 हजार पुस्तके वाटप (Video)

Maharashtra Political News | ‘बावनकुळेंना त्यांच्या पक्षात किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार?’

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन संघाचा विजयी चौकार !!

 

Related Posts