IMPIMP

Maharashtra Political News | ‘बावनकुळेंना त्यांच्या पक्षात किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार?’

by nagesh
Maharashtra Political News | congress nana patole replied bjp and chandrashekhar bawankule on rahul gandhi visit in maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) मातोश्रीवर
जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
(Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया देताना धमकी वजा इशार दिला आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानाबाबत
माफी मागावी, मगच महाराष्ट्रात (Maharashtra Political News) पाय ठेवावा असे बावनकुळे म्हणाले आहेत. बावनकुळेंच्या वक्तव्यावर काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांचा मुंबई, महाराष्ट्रातील दौरा (Maharashtra Tour) अद्याप नक्की झालेला नाही. मात्र ते लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधी यांना महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या पक्षातही (Maharashtra Political News) काही किंमत नाही, ते राहुल गांधींना काय रोखणार? राहुल गांधींना जेव्हा महाराष्ट्रात यायचे त्यावेळी ते येणारच व काँग्रेस कार्यकर्ते त्यांचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करतील असं नाना पटोलेंनी म्हटले आहे.

 

 

भाजपाच्या नेत्यांनी माफी मागावी

पटोले पुढे म्हणाले, राहुल गांधी यांना महाराष्ट्रात येण्यासाठी भाजप, बावनकुळे किंवा कोणाच्या परवानगीची गरज नाही.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phul),
सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांचा अपमान करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी माफी मागावी आणि त्यानंतरच बोलावं, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

 

 

राहुल गांधीवर बोलल्याशिवाय झोप लागत नाही

राहुल गांधी यांची बदनामी करण्यासाठी भाजपाकडून करोडो रुपये खर्च केले जात आहेत. तरीही राहुल गांधींना मोठे जनसमर्थन मिळत आहे. काँग्रेस पक्ष संपला आहे, तो दुर्बिणीतूनही दिसत नाही, राहुल गांधींना गांभिर्याने घेण्याची गरज नाही म्हणणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना राहुल गांधी यांच्यावर बोलल्याशिवाय झोप लागत नाही, अशी टीका पटोले यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजप, मोदी राहुल गांधींना घाबरते

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व भाजपला चोख उत्तर देऊ शकणारे देशातील आज राहुल गांधी हेच एकमेव नेते आहेत. राहुल गांधींना भाजप व मोदी घाबरते म्हणून तर डझनभर मंत्री, संत्री दररोज राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात, अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

 

 

Web Title :-  Maharashtra Political News | congress nana patole replied bjp and chandrashekhar bawankule on rahul gandhi visit in maharashtra

 

हे देखील वाचा :

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन संघाचा विजयी चौकार !!

BJP MLA Ashish Shelar | ‘सकाळी सीरियल किलर…’ संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार म्हणाले-‘लोकशाही आणि संविधानामुळे तुम्ही…’

Satyashodhak Marathi Movie | ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या टीझरचे शरद पवार यांच्याकडून कौतुक

 

Related Posts