IMPIMP

Praniti Shinde On BJP | सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला, प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल

by sachinsitapure

सोलापूर : – Praniti Shinde On BJP | सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha) काँग्रेसच्या (Congress) उमेदवार आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) या दोन युवा आमदारांमध्ये थेट लढत होत आहे. प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रचार सभांमधून भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. केंद्रात राज्यात सलग दहा वर्षे सत्ता असूनही सोलापूर लोकसभेचा उमेदवार दर निवडणुकीला का बदलावा लागतो असा सवाल काँग्रेसच्या उमेदावर प्रणिती शिंदे यांनी भाजपला केला आहे. त्या मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्यातील मरवडे येथे बोलत होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त त्या बोराळे मरवडे हुलजंती गावच्या दौऱ्यावर आल्या आहेत. मरवडे येते बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, देशातील अर्थकरण हे शेतकऱ्यांच्या जीवावर असून शेतीप्रधान देशातील शेतकऱ्यांचे अस्तित्व संपण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. त्यांनी महागाई वाढवली, दुधाचा प्रश्न मार्गी लावला नाही, पीक विम्याचे पैसे दिले नाहीत, गुजरातचा कांदा परदेशात पाठवत महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यात बंदी का? असा सवाल करुन अंबानी अदानीसह पाच ठेकेदाराचे हित पाहण्याचे कम सुरु असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

पुढील दहा वर्षात काय काम करणार यावर न बोलता जात, धर्म, पात हे मुद्दे काढून निवडणुकीला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. तुम्ही मतदारांनी या निवडणुकीची एक लढाई माझ्यासाठी करावी पुढची लढाई मी तुमच्यासाठी लढेन असे सांगून मला संधी मिळाल्यास लोकसभेत पहिला आवाज हा शेतकऱ्यांचा असेल, असे आश्वासन प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिले.

Supreme Court To Ajit Pawar NCP | ‘घड्याळा’बाबत ‘तो’ उल्लेख करा, अन्यथा…, सुप्रीम कोर्टाची अजित पवार गटाला पुन्हा समज

Related Posts