IMPIMP

Prashant Damle | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत दामलें बाबत केली ‘ही’ मोठी घोषणा

by nagesh
 Prashant Damle | prashant damle 12500 drama show devendra fadnavis announced that he suggested his name for padama awards

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम : प्रशांत दामले (Prashant Damle) म्हटलं की नाटक हा शब्द आपोआप तोंडातून बाहेर येतो. एवढेच नाही तर मागील तीन दशके मराठी नाटक गाजवणारा प्रसिद्ध अभिनेता म्हणून प्रशांत दामले यांची ओळख आहे. काल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात त्यांनी 12500 चा विक्रमी (12500 Drama Show) टप्पा गाठला आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट असे नाटकाचे नाव होते. यावेळी त्यांनी त्यांच्या सगळ्या जुना आठवणींना उजाळा दिला होता. एका कलाकारांनी इतके प्रयोग करणे याचे बहुदा एकमेव उदाहरण म्हणजे प्रशांत (Prashant Damle) दामले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुंबईत झालेल्या नाटकाच्या प्रयोगाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशांत दामले यांना सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रेक्षकांकडून दामले यांना पद्म पुरस्कार (Padama Awards) द्यावा अशी शिफारस करण्यात आली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या नावाची शिफारस आधीच केली असल्याचे सांगितले. हे ऐकून प्रेक्षकांना अतिशय आनंद झाला.

 

 

मराठी चित्रपट सृष्टी तसेच मराठी रंगभूमीसाठी दामले यांना पद्म पुरस्कार मिळणे ही खूपच अभिमानाची बाब आहे.
12500 प्रयोग पार पडणं ही अजिबातच सोपी गोष्ट नाही. या प्रवासात दामले यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.
याविषयी सांगताना दामले म्हणाले, “एवढे प्रयोग कधी झाले कसे झाले हे मलाच काही कळाले नाही.
नाटक करायला घरच्यांचा विरोध होता कारण त्यावेळी नाटकांचा भार ओसरत चालला होता.
पण तुम्हाला सांगतो की ही चर्चा सतत होत असते नाटक आजवर काही थांबले नाही आणि थांबणार देखील नाही.
काळानुसार नाटक फक्त बदलत गेले आहे जो खरा नाटकवाला त्याला याची जाणीव आहे”.
अशी भावना प्रशांत दामले यांनी यावेळी व्यक्त केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Prashant Damle | prashant damle 12500 drama show devendra fadnavis announced that he suggested his name for padama awards

 

हे देखील वाचा :

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये लढणाऱ्या भारताचे इंग्लंडविरुद्ध असे आहे रेकॉर्ड

Pune Crime | वाढदिवस साजरा करायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Pune Crime | पुण्यातील अभ्यासिकेत जुळलं सुत, लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

 

Related Posts