IMPIMP

Property Card | महाराष्ट्रातील २६ हजार गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण; 9 लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप

by nagesh
Property Card | Completed drone survey of 26 thousand villages in Maharashtra; 9 lakhs for allotment of property cards

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Property Card | महाराष्ट्रातील तब्बल २६ हजार गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले असून नऊ लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप झाले आहे. त्यामुळे संबंधितांना मालकी हक्काचा पुरावा प्राप्त झाला आहे. गावठाण भूमापन न झालेल्या सर्व गावांचे गावठाणातील मिळकतीचे भूमापन करून प्रॉपर्टी कार्ड स्वरूपात अधिकार अभिलेख उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) ‘स्वामित्व योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गावांमधील ग्रामस्थांना मालकी हक्काच्या प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात येत आहे. (Property Card)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत बोलताना जमाबंदी आयुक्त सुधांशु म्हणाले, ‘सन २०२० मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश आणि पंजाब या राज्यांत स्वामित्व योजना लागू झाली. त्यानंतर आता संपूर्ण देशभर ही योजना लागू झाली आहे. या योजनेअंतर्गत गावांतील जागांचे (घरे, जमीन) यांचे सर्वेक्षण करून अभिलेख तयार करण्यात येत आहेत. तसेच तेथील नागरिकांना मिळकत पत्रिका देण्यात येत आहेत. देशभरातील ४१ हजार गावांचे सर्वेक्षण आतापर्यंत जाले आहे. मिळकत पत्रिका ऑनलाइन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. (Property Card)

 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथे पथदर्शी प्रकल्प म्हणून सन २०१८ मध्ये गावठाणातील ग्रामपंचायत नगर भूमापन करून मिळकत पत्रिकांचे वाटप करण्यात आले होते. सोनोरी येथील उपक्रम तांत्रिकदृष्ट्या यशस्वी ठरल्याने राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने महसूल विभागाच्या सहकार्याने गावठाण भूमापन योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू करण्याचा निर्णय २२ फेब्रुवारी २०१९ रोजी घेतला. या योजनेची यशस्विता व त्याचा ग्रामीण जीवनावर होणारा परिणाम पाहून केंद्र शासनाने ही योजना स्वीकारली आहे. केंद्र शासनाने पंचायत राज अंतर्गत स्वामीत्व योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मे २०२० रोजी जाहीर केली.

 

देशभरात लागू झालेली स्वामित्व योजनेची सुरूवात महाराष्ट्रातून झाली आहे.
या योजनेअंतर्गत देशातील साडेसहा लाख गावांचे सर्वेक्षण करून तेथील नागरिकांना मिळकत पत्रिका देण्यात येत आहेत.
सन २०२५ पर्यंत हे उदिष्ट्य पूर्ण करायचे आहे. महाराष्ट्रातील ४४ हजार ३४५ गावांपैंकी २६ हजार गावांचे
ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले असून नऊ लाख मिळकत पत्रिकांचे वाटप झाले आहे.

– एन. के. सुधांशु, जमाबंदी आयुक्त

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Property Card | Completed drone survey of 26 thousand villages in Maharashtra; 9 lakhs for allotment of property cards

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून दुकानदाराच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; पाषाण परिसरातील घटना

Pune Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून शिंदवणे, लोणीकाळभोर आणि उरळी कांचन परिसरातील दारू अड्डे उध्वस्त

 

 

Related Posts