IMPIMP

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून दुकानदाराच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; पाषाण परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Chatushringi Police Station - Beating on forehead with scissors for minor reason

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका दुकानदाराच्या दुकानाची मोडतोड करुन त्याच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Pune Crime). याप्रकरणी संदीप विलासराव तुपे (वय ४०, रा. श्रीनिवास सोसायटी, बालाजी चौक, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) फिर्याद (गु. रजि. नं. ३९८/२२) दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यानुसार राज मानवतकर (वय २०), चंदू खेतावत (वय २०), किशोर गोपी मेघावत (वय २०), नितीन ऊर्फ बया मेघावत (वय २०), नितीन वैदय (वय २५ , सर्व रा. लमाण तांडा, पाषाण) व त्यांचे तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पाषाणमधील साई चौकातील रॉयल कॉपिअर्स या दुकानात बुधवारी रात्री नऊ वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्या पूर्वी भांडणे झाली होती.
फिर्यादी यांचे रॉयल कॉपिअर्स हे झेरॉक्सचे दुकान आहे. ते दुकानात असताना आरोपी तेथे आले.
त्यांनी दुकानातील स्टेशनरी कॉम्प्युटर साहित्य फेकून दिले.
दुकानातील दोन मोठे झेरॉक्स मशीन, दोन कॉम्प्युटर, काचेची पार्टीशन, स्टेशनरी साहित्य यांच्यावर दगड घालून
फोडले. फिर्यादी यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर साई चौक, सुतारवाडी, पाषाण परिसरात मोटारसायकलवरुन फिरुन मोठ मोठ्याने आरडा ओरडा करुन दहशत पसरविली.

 

नितीन वैदय हा पोलीस रेकॉर्डवरील (Pune Criminals) गुंड असून पोलिसांनी सर्वांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कोळी अधिक तपास करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Shubham Ashok Mane Who Cheat College Students sinhagad raod police station case

 

हे देखील वाचा :

Pune Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून शिंदवणे, लोणीकाळभोर आणि उरळी कांचन परिसरातील दारू अड्डे उध्वस्त

Pune Crime | रूमवर पोरी-पोरांना आणतो, धंदा करतो? सहायक पोलीस निरीक्षक (API) असल्याची बतावणी करून कॉलेज विद्यार्थ्याची फसवणूक; भामटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जूना पूल पाडण्यासाठी आणखी 8 दिवस लागणार?

Sharad Pawar | काय झाडं, काय हवा… एखाद्या वेळी ठीक; पण…, शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही टोचले कान!

 

Related Posts