IMPIMP

PUC Rate Hike | वाहनांची पीयूसी करण्यासाठी मोजायला लागणार जादा पैसे

by nagesh
PUC Rate Hike | puc centres announce hike in rates across maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन PUC Rate Hike | वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (PUC) करणे बंधनकारक केले आहे. मात्र आता ही चाचणी करण्यासाठी वाहनधारकांना जादा पैसे मोजावे लागणार आहे. दरवाढ करत असल्याचे परिवहन विभागाने (Transportation Department) नुकतेच जाहीर केले आहे. तात्काळ ही दरवाढ (PUC Rate Hike) लागू करण्यात आली असून दुचाकीसाठी (Two – Wheeler) 15 रुपये तर चारचाकीसाठी (Four – Wheeler) 35 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी धुरांमुळे वायू प्रदूषणात भर पडते. त्यासाठीच वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनांची PUC करणे बंधनकारक आहे. जर एखादे नवीन वाहन खरेदी केले असेल तर पीयूसीची मुदत एक वर्षापर्यंत असते त्यानंतर दर 6 महिन्यांनी पीयूसी काढणे बंधनकारक असते. दुचाकीच्या पीयूसीसाठी 35 रुपये आकारले जात होते मात्र नव्या दरवाढीनुसार 50 रुपये द्यावे लागणार आहे. (PUC Rate Hike)

 

पेट्रोलवरील तीन चाकी (Three Wheeler) वाहनाचाही दर 70 रुपयांवरून 100 रुपये, पेट्रोल (Petrol), सीएनजी (CNG), एलपीजी (LPG) वर चालणारे चारचाकी वाहने 90 रुपयांवरून 125 रुपये आणि डिझेलवरील चालणाऱ्या वाहन चाचणीचा दर 110 रुपयांवरून 150 रुपये करण्यात आला आहे.

 

Web Title :- PUC Rate Hike | puc centres announce hike in rates across maharashtra

 

हे देखील वाचा :

Sangli Crime | सांगलीतील धक्कादायक घटना ! महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाची पोलीस ठाण्यात आत्महत्या

LIC IPO Price | गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी ! एलआयसीच्या IPO साठी इतकी असेल एका शेअरची किंमत

Rocket Share | स्वस्त शेयरने केली कमाल, एका वर्षात दिला 3765% रिटर्न

 

Related Posts