IMPIMP

Pune ACB Trap | 10 हजाराची लाच घेणारा मावळ तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption department: A female junior assistant and a teacher in the net of anti-corruption in the case of bribe of 16 thousand

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune ACB Trap | 12 हजार रूपयाच्या लाचेची मागणी (Pune Bribe Case) करून 10 हजार रूपये लाच म्हणून
घेणार्‍या मावळ तालुक्यातील (Maval Taluka) ग्रामविकास अधिकार्‍याला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे
(Pune Crime News). त्याच्याविरूध्द कामशेत पोलिस ठाण्यात (Kamshet Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB
Trap)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विलास तुकाराम काळे Vilas Tukaram Kale (46, ग्रामविकास अधिकारी – Gamvikas Adhikari, ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे आईच्या नावावर खरेदी केलेल्या जागेवर पत्र्याचे शेडची नोंद ग्रामपंचायत खडकाळे – कामशेत येथे करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी विलास काळे यांची भेट घेतली होती. ग्रामविकास अधिकारी विलास काळे यांनी 8 अ उतार्‍यावर नोंद करण्यासाठी सुरूवातीला 12 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तात्काळ पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. (Pune ACB Trap)

 

ग्रामविकास अधिकारी विलास काळे यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून ती स्विकारली. त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे (PI Shreeram Shinde) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-   Pune ACB Trap | Gramvikas Adhikari Vilas Tukaram Kale of Maval taluka who took a bribe of 10 thousand in the net of pune anti-corruption

 

हे देखील वाचा :

Jal Jeevan Mission Maharashtra | जलजीवन मिशनमध्ये पाड्यांच्या समावेश होण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Maharashtra Politics News | ‘एकनाथ शिंदे 2014 सालीच बंड करणार होते, उद्धव ठाकरेंचा कॉल आला अन्…’

Pune Crime News | चतुःश्रृंगी परिसरात दहशत निर्माण करणार्‍या सराईतावर MPDA कायद्यान्वये कारवाई, पोलिस आयुक्तांची 9 वी कारवाई

Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते न्हावरा ते चौफुला रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

 

Related Posts