IMPIMP

Pune ACB Trap News | पुणे महानगरपालिकेतील सेवकाविरूध्द (शिपाई) 20 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल

by sachinsitapure
Pune ACB Trap News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune ACB Trap News | 20 हजार रूपयाची लाच मागितल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) आरोग्यभवन (Pune Arogyabhavan) मधील सेवकाविरूध्द (शिपाई) पुणे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station Pune) गुन्हा दाखल केला आहे. (Pune ACB Trap News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

इर्शाद (पद-शिपाई, आरोग्यभवन, पुणे मनपा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे (Bribe). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मृत जनावरे उचलण्याचा करार होता. त्या कराराची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांची पुणे महापालिकेतील ठेव असलेली रक्कम परत दिल्याच्या मोबदल्यात सेवक इर्शादने त्याच्या वरिष्ठांसाठी तडजोडीअंती 20 हजार रूपयाची लाच दि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी मागितली होती. (Pune ACB Trap News)

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडे त्याची तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी केल्यानंतर इर्शाद याच्याविरूध्द 20 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे
(Addl SP Dr Sheetal Janve), पोलिस उप अधीक्षक नितीन जाधव (DySP Nitin Jadhav) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे (PI Shreeram Shinde), पोलिस अंमलदार प्रविण तावरे,
चालक पोलिस हवालदार कदम यांच्या पथकाने केली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रूपेश जाधव (PI Rupesh Jadhav) करीत आहेत.

Related Posts