IMPIMP

Pune ACB Trap News | ना हरकत पत्र देण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना पुणे महानगरपालिकेचा मीटर रिडर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

2 वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी प्रत्येकी 10 हजार व स्वत: साठी 5 हजार रुपये

by nagesh
Pune ACB Trap News | Taking a bribe of 25 thousand to give a no objection letter, the meter reader of the Pune Municipal Corporation is in the net of anti-corruption

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune ACB Trap News | पुणे महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) ना हरकत पत्र No Objection Certificate (NOC) देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच घेणार्‍या मनपाच्या मीटर रिडरला पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. (Pune ACB Trap News)

 

उमेश राजाराम कवठेकर Umesh Rajaram Kavathekar (वय ५४) असे या मीटर रिडरचे नाव आहे. तो चतु:श्रृंगी (Chaturshringi) पाणी पुरवठा विभागात नोकरीला आहे. (Pune ACB Trap News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

तक्रारदार हे परवानाधारक प्लंबर आहे. ते लायझनिंगचे काम करतात. बांधकाम व्यावसायिकाने शिवाजीनगर (Shivaji Nagar) येथील मिळकतीला पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत पत्र हवे होते. त्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार हे कर्वे रोडवरील (Karve Road) पाणी पुरवठा विभागात गेले असता ना हरकत पत्रासाठी उमेश कवठेकर याने 25 हजार रुपयांची लाच मागितली (Pune Bribe Case). तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्याची पडताळणी करताना उमेश कवठेकर याने दोन वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी प्रत्येकी 10 हजार रुपये व स्वत:साठी 5 हजार रुपये अशी एकूण 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर मंगळवारी कर्वे रोडवरील पाणी पुरवठा विभागात सापळा रचण्यात आला. (Pune Crime News)

तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारताना कवठेकर याला पकडण्यात आले. ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Dr. Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
असल्याचे पोलिस उप अधीक्षक नितीन जाधव (DySP Nitin Jadhav) यांनी कळविले आहे.
पोलीस निरीक्षक संदिप वर्‍हाडे (PI Sandeep Varhade) तपास करीत आहेत.

Web Title : Pune ACB Trap News | Taking a bribe of 25 thousand to give a no objection letter,
the meter reader of the Pune Municipal Corporation is in the net of anti-corruption

Related Posts