IMPIMP

Pune BJP | प्रभाग 19 मधील समस्या सोडविण्यासाठी भाजप नगरसेविका अर्चना पाटील आणि तुषार पाटील नेहमीच अग्रेसर; मनपा निवडणुकीत काँग्रेसला त्यांची जागा दाखवा – जगदीश मुळीक (Video)

by nagesh
Pune BJP | BJP corporators Archana Patil and Tushar Patil are always in the forefront to solve the problems in Ward 19; Show Congress their place in the municipal elections - Jagdish Mulik

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यातील प्रभाग 19 मधील समस्या सोडविण्यासाठी अर्चना पाटील (Archana Patil) आणि तुषार पाटील (Tushar Patil) नेहमी अग्रेसर असतात. कोरोना काळात पुण्यातील भाजपचे (Pune BJP) नगरसेवक आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत होते तेव्हा काँग्रेसचे (Congress) नेते घरात लपून बसले होते. येत्या निवडणुकीत (PMC election) काँग्रेसच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून पुन्हा भवनी पेठेमध्ये (Bhavani Peth) कमळ फुलवू असे पुणे भाजप (Pune BJP) शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी म्हटले. प्रभागातील डांबरीकरणाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

दिलीप कांबळे म्हणाले, ज्यांच्याकडे आपण मागील काळात सत्ता दिली त्या काँग्रेसने फक्त राजकारण केले.
लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पण जनतेचा त्यांनी विश्वासघात केला.
या येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा. अर्चना पाटील म्हणाल्या,
काम करतांना अनेक अडचणी येतात पण ते काम पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
प्रभागाच्या विकासासाठी मी कायम काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

 

 

कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका अर्चना पाटील यांनी केले होते. या प्रसंगी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष (Pune BJP) जगदीश मुळीक, ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे, पीएमपी माजी अध्यक्ष भीमराव पाटोळे, मनावर खान, परमार कुमार, डिंपल दसानी, सनी अडागळे, समीर शेंडकर, दिनेश रासकर, मनोज भंडारी, परवीन तांबोळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केले. आभार सनी अडागळे यांनी मानले.

 

Web Title :- Pune BJP | BJP corporators Archana Patil and Tushar Patil are always in the forefront to solve the problems in Ward 19; Show Congress their place in the municipal elections – Jagdish Mulik

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | खुशखबर ! नवरात्रीपूर्वी ‘विक्रमी’ स्तरापासून 9,500 रूपयांनी ‘स्वस्त’ झाले सोने; जाणून घ्या नवीन दर

MP Supriya Sule | लखीमपूरच्या घटनेवरून खा. सुप्रिया सुळेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘घणाघात’, म्हणाल्या… (व्हिडीओ)

SMS Email Alert | तुम्हाला सुद्धा आला असेल ‘हा’ SMS किंवा ई-मेल तर व्हा सावध; अन्यथा बुडतील तुमचे सर्व पैसे; जाणून घ्या

 

Related Posts