IMPIMP

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

by nagesh
Pune water Supply | Water supply in the city will be closed on Thursday

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या (Pune Water Supply) वारजे जलकेंद्र (Warje Water Station), खडकवासला उपसा (रॉ वॉटर) केंद्र तसेच रायझिंग मेन लाइनवर (Rising Main Line) स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी कामे करावयाचे असल्यामुळे, येत्या गुरुवारी (दि.27) कोथरुड (Kothrud), डेक्कन (Deccan), बाणेर-बालेवाडी (Baner-Balewadi) तसेच विमाननगर (Vimannagar) व लोहगाव परिसरातील (Lohgaon) पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. तर शुक्रवारी (दि.28) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या कामामुळे गुरुवारी (दि.27) वारजे जलकेंद्र येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे. यामुळे वारजे व पाषाण जलकेंद्र तसेच नवीन होळकर जलकेंद्र यांना होणारा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar) यांनी दिली.

 

 

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

वारजे जलकेंद्र – भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरुड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर

 

 

होळकर जलकेंद्र – कळस, धानोरी, विमाननगर, लोहगाव पंचायत, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, बोपोडी, खडकी, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, मुळा रोड, संगमवाडी, पाटिल इस्टेट, भांडारकर रोड.

 

 

Web Title : Pune city water supply will closed on Thursday 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पोलीस भरतीसाठी आला अन् वाईट संगतीला लागला; विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्याला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

Nagpur Crime | महिलांच्या अश्लील ‘न्यूड डान्स’ प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; 10 आयोजक, 3 नृत्यांगना ताब्यात

Subhash Ghai | एकेकाळी ‘सुभाष घई’च्या तालावर नाचायचा बाॅक्स ऑफिस, माधुरी दिक्षीतकडून साईन करुन घेतले होता ‘नो प्रेग्नेंसी’ बाॅन्ड

Good Sleep Tips | रात्री हवी असेल शांत झोप, तर रात्रीच्या जेवणात खाऊ नका ‘हे’ 5 पदार्थ; जाणून घ्या

Long Covid Signs | लाँग कोविडची अशी 5 लक्षणे ज्यांच्याकडे नेहमी केले जाते दुर्लक्ष ! जाणून घ्या

 

Related Posts