IMPIMP

Pune Collector On Helmet Compulsion | ‘पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नाही’; जिल्हाधिकारी राजेश देशमुखांचे स्पष्टीकरण

by nagesh
Pune Collector On Helmet Compulsion | no helmet is compulsion in pune district collector rajesh deshmukh explained today

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Collector On Helmet Compulsion | पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती (Helmet Compulsion) नसेल असं स्पष्टीकरण पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Pune District Collector Rajesh Deshmukh) यांनी दिले आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल तर त्यांचं प्रबोधन केलं जाईल. पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येताना हेल्मेट वापरावे यासाठी त्यांना सुचना करण्यात आल्या असल्याचे देशमुख यांनी म्हटलं होतं. (Pune Collector On Helmet Compulsion)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काल (गुरुवारी) जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून काल हेल्मेटच्या वापराविषयी आदेश काढण्यात आले होते. यामुळे पुण्यात सर्वसामान्यांना हेल्मेट सक्ती केल्याचा समज निर्माण झाला होता. परंतु, आता जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्मेट सक्ती नसणार आहे हे स्पष्ट केले आहे.

 

एकीकडे राज्य मास्कमुक्त झाले आहे. पण पुणेकरांवर मात्र सक्ती करण्यात आली होती. ही सक्ती मास्क अथवा सोशल डिस्टन्सिंगची नाही, तर हेल्मेटची असण्याचा निर्णय झाला होता. पुण्यामध्ये दुचाकीवरून प्रवास करताना 1 एप्रिलपासून हेल्मेटसक्ती (Helmet Compulsion In Pune) असल्याचं स्पष्टं करण्यात आलं होतं. शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका अशा सर्व परिसरातल्या रस्त्यांवर हेल्मेट घालणं बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच 4 वर्षांवरील सर्वांना हेल्मेट वापरणं सक्तीचं असल्याचंही म्हटलं होतं. हेल्मेटसक्तीचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली होती. पण, पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं जिल्हाधिकारी देशमुख यांनी माहिती दिली.

 

या दरम्यान, रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण जादा आहे.
त्यातही हेल्मेटअभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या जादा आहे.
कार चालकांच्या तुलनेत दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट जादा असतो. रस्ते अपघातात जीव गमावलेल्यांपैकी 62 टक्के व्यक्तींचा डोक्यावर इजा झाल्याने मृत्यू झाला आहे. हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्के आहे. म्हणून हेल्मेटची सक्ती केली होती. पण, आता पुण्यात हेल्मेट सक्ती नसणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Collector On Helmet Compulsion | no helmet is compulsion in pune district collector rajesh deshmukh explained today

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 16 वर्षीय विद्यार्थ्यानं ट्युशन घेण्यासाठी घरी आलेल्या शिक्षीकेचा बाथरूममधील व्हिडीओ केला ‘रेकॉर्ड’

Pune Nana Peth Fire | नाना पेठेतील गोदामाला भीषण आग ! फायबरचा कारखाना, स्पेअर्स पार्ट, स्पंज, लाकडी सामानाचे गोदाम जळून खाक; अग्निशामक दलाच्या 2 अधिकाऱ्यांसह 4 जखमी

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या चांदीचे दर

 

Related Posts