IMPIMP

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 104 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, 867 patients of 'Corona' were discharged in Pune city, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुणे शहरामध्ये कोरोनाची (Pune Corona) दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 96 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 104 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 04 हजार 016 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 94 हजार 111 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9073 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुण्यात 832 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

पुणे शहरामध्ये सध्या 832 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 139 रुग्ण गंभीर आहेत. तर 115 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5490 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 35 लाख 30 हजार 027 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
(Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | Comfortable! 104 patients of ‘Corona’ discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Jalyukt Shivar Yojana | ‘जलयुक्त शिवार योजनेला क्लिन चीट’, सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण

RBI | आरबीआयकडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेला 90 लाखांचा दंड

Pune Crime | शाळेत केलेल्या कृत्याचा 16 वर्षांनी घेतला ‘असा’ बदला, पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Forest caught leopard | तब्बल 17 तासानंतर पुण्याच्या हडपसर परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद

 

Related Posts