IMPIMP

Pune Crime | शाळेत केलेल्या कृत्याचा 16 वर्षांनी घेतला ‘असा’ बदला, पुण्यातील खळबळजनक घटना

by nagesh
Beed Crime News | wifes immoral relationship with neighbors husband commits suicide in beed crime news beed police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  शाळेत शिकत असताना एका तरुणाने मारहाण केल्याचा राग मनात धरुन तब्बल 16 वर्षांनी बदला घेतल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. एका तरुणाने शाळेत मारहाण केल्याचा बदला आरोपींनी भर रस्त्यात बेदम मारहाण करुन घेतला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi police station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुण्यात (Pune Crime) 24 ऑक्टोबर रोजी औंध परिसरातील एम्स हॉस्पिटलसमोर (AIIMS Hospital)  घडला.

विकी शिरतर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमोल कांबळे Amol Kamble (वय-33) यांनी फिर्याद
दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच शाळेत शिकत होते. आरोपींनी फिर्यादी यांना रस्त्यात गाठून आपण दोघंही एकाच शाळेत होते. तू मला सारखा मारायचा असं म्हणत बेदम मारहाण (Pune Crime) केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

घटनेच्या दिवशी आरोपी त्याच्या मित्राला घेऊन दुचाकीवरुन त्या ठिकाणी आला. त्यानंतर मला ओळखलं का ? अशी विचारणा केली. यावेळी आमोल याने दोघंही एकाच शाळेत एकाच वर्गात शिकलो असे सांगितले. ओळख पटल्यानंतर आरोपी विकी याने शाळेत असताना तू माला खूप मारत होता, आता तुला मी सोडणार नाही, असं म्हणत शिवीगाळ करायला सुरुवात केली.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने कांबळे यांच्या घरात शिरुन बॅटने डोळ्यावर, पाठीवर आणि हातावर बेदम मारहाण केली.
याप्रकरणी जखमी अमोल कांबळे यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | school classmate took revenge after 16 years and beat man in pune chaturshrungi police station

 

हे देखील वाचा :

Pune Forest caught leopard | तब्बल 17 तासानंतर पुण्याच्या हडपसर परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद

former Indonesian President Sukarno | इण्डोनेशियाचे संस्थापक राष्ट्रपती सुकर्णो यांची कन्या इस्लाम सोडून स्वीकारणार हिंदू धर्म, जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्येचा देश

Sameer Wankhede | पाय खोलात ! वानखेडेंना दुहेरी दणका; NCB नं चौकशी सुरु करण्यापूर्वीच अडचणीत वाढ

 

Related Posts