IMPIMP

Pune Corporation Elections | 3 सदस्यीय प्रभागामुळे ‘संधी’ चे टेन्शन ! त्यात निवडणूका पुढे जाणार? ही विवंचना

इच्छुक उमेदवारांमधील संभ्रम वाढला

by nagesh
 Pune PMC News | Only 1 thousand 734 acacia, subabhali trees will be removed in the river bank improvement plan

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation Elections | ऑक्टोबर महिन्यातील तीन आठवडे उलटूनही महापालिका निवडणुकांची (Pune Corporation Elections) प्रभाग रचना (prabhag list) व आरक्षण (reservation) सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून (election commission of maharashtra) अद्याप जाहीर न झाल्याने नगरसेवक व ‘इच्छुकांमधील’ धाकधूक वाढली आहे. अगोदरच तीन सदस्यीय प्रभागरचनेमुळे ‘संधी’ मिळणार? या विवंचनेत असलेल्या इच्छुकांना निवडणुका ‘पुढे’ जाणार का, (postponed) याचे टेन्शन आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

राज्यातील 10 मोठ्या महापालिकांसह कोरोनामुळे पुढे ढकलेल्या महापालिकांच्या निवडणुका (Pune Corporation Elections) येत्या फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश संबधित महापालिकांना दिले आहेत. एरव्ही निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसह आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ऑक्टोबरच्या मध्यावरच जाहीर केला जातो. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष आचारसंहिता लागू होण्यापुर्वी इच्छुक उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा अवधी मिळतो.

 

परंतू कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा प्रथमच कार्यकाळ संपलेल्या काही महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले असून महापालिकांना निवडणुकीसाठी (Pune Corporation Elections) सहा महिने व त्याहून अधिककाळ मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा प्रभाव वेगाने कमी होत असून लसीकरणामुळे सर्व व्यवहार जवळपास सुरळीत झाले आहेत. असे असतानाही ऑक्टोबरचे तीन आठवडे उलटूनही राज्य निवडणुक आयोगाकडून अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर न केल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

 

आरक्षणाच्या उत्सुकतेने ‘टेन्शन’मध्ये भर

पुणे महापालिकेमध्ये २३ गावांचा समावेश केल्याने नगरसेवकांची संख्या १६६ होणार आहे. यामुळे ५५ प्रभाग (prabhag list pune) तीन सदस्यीय राहाणार असून एक प्रभाग (prabhag list pune) चार सदस्यांचा अथवा दोन प्रभाग प्रत्येकी दोन सदस्यांचे होणार आहेत. ५० टक्के महिला आरक्षणामुळे यापैकी निम्म्या अर्थात २७ ते २८ प्रभागांमध्ये दोन महिला व एक पुरूष उमेदवार राहाणार आहे. यामुळे सध्याच्या चार सदस्यीय प्रभागामध्ये असलेल्या दोन पुरूष सदस्यांपैकी एकाचा पत्ता कट होणार आहे. यामध्ये पुन्हा जातीय आरक्षण कसे पडेल यावर त्या एका सदस्याचे गणित अवलंबून राहाणार आहे. हीच बाब विद्यमान नगरसेविकांनाही (corporators) लागू होणार असल्याने त्यापण टेंन्शनमध्ये आल्या आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title :- Pune Corporation Elections | Tension of ‘opportunity’ due to 3 member ward! Will the election go ahead? This deprivation

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Nagar | अहमदनगर महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रविण मानकर यांच्यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून मोठी कारवाई; प्रचंड खळबळ

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 114 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Rupali Chakankar | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! रूपाली चाकणकर यांची ‘या’ पदावर केली नियुक्ती

 

Related Posts