IMPIMP

Pune Corporation | उड्डाणपुलांवर करण्यात आलेली बहुतांश ठिकाणची विद्युत रोषणाई बंदच ! सद्गुरू शंकर महाराज उड्डाणपुलावरील विद्युत केबलच चोरीला गेली

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महापालिकेने (Pune Corporation) विविध उड्डाणपुल आणि नदीवरील पुल रात्रीच्यावेळी आकर्षक दिसावेत यासाठी केलेली ‘विद्युत रोषणाई’ अनेक पुलांवरून गायब झाली आहे. या रोषणाईसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले असून काही ठिकाणी केबल व यंत्रणांच चोरून नेल्याने ही रोषणाई बंद असल्याचे समोर आले आहे. (Pune Corporation)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शहरात मोठ्याप्रमाणावर उड्डाणपुल उभारण्यात आले आहेत. हे उड्डाणपुल आकर्षक दिसावेत यासाठी काही ठिकाणी पुलांच्या भिंतीवर म्युरल्स, पुलाखाली गार्डन्स तसेच पुलांना विद्युत रोषणाई देखिल करण्यात आली आहे.
शहरातील आतापर्यंतचा सर्वाधीक लांबीचा पूल म्हणून ओळख असलेल्या सातारा रस्त्यावरील बालाजीनगर येथील सद्गुरू शंकर महाराज उड्डाणपुलाला सर्वप्रथम आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
या विद्युत रोषणाईसाठीचा खर्च काही लाखांमध्ये करण्यात आला आहे.
परंतू गेल्या अनेक महिन्यांपासून ही रोषणाई बंदच आहे.
स्थानीक नगरसेवक व माजी महापौर दत्तात्रय धनकवडे (Dattatraya Dhanakwade) यांनी ही रोषणाई सुरू करण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाकडे पाठपुरावा केला.
त्यावेळी या विद्युत रोषणाईसाठी वापरण्यात आलेली केबल व यंत्रणाच चोरीला गेल्याचे लक्षात आले.
या दुरूस्तीसाठीचा खर्चही मोठा येणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यानिमित्ताने महापालिकेने (Pune Corporation ) मुठा नदीवरील राजर्षि शाहू सेतू, छत्रपती शिवाजी महाराज पूल,
जयंतराव टिळक पूल, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पूल (बालगंधर्व), संभाजी पूल आणि पूना हॉस्पीटल येथील स्व. यशवंतराव चव्हाण पुलाला केलेल्या विद्युत रोषणाईचा आढावा घेतला.
त्यामध्ये राजर्षि शाहू सेतू, छत्रपती शिवाजी महाराज पूल आणि जयंतराव टिळक पुलाची विद्युत रोषणाई देखिल अनेक महिन्यांपासून बंदच असल्याचे निदर्शनास आले आहे.
सध्या केवळ उर्वरीत तीन पुलांचीच विद्युत रोषणाई सुरू आहे.

 

यासंदर्भात महापालिकेच्या विद्युत विभागाचे उपअभियंता अभिजीत साठे (Abhijeet Sathe) यांच्याशी संपर्क साधला असता,
ते म्हणाले की सद्गुरू शंकर महाराज उड्डाणपुलाच्या विद्युत रोषणाईचे काम सहा वर्षांपुर्वी करण्यात आले आहे.
दुरूस्तीचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे.
तसेच नदीवरील ज्या पुलांची विद्युत रोषणाई बंद आहे, ती देखिल पुन्हा सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

 

Web Title :- Pune Corporation | Most of the places on the flyovers have no electric lighting Sadguru Shankar Maharaj The power cable on the flyover was stolen

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘…म्हणून आम्हाला नोटापेक्षा कमी मतदान झालं’ – संजय राऊत

Pune Corporation | उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील टीपी स्किमचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करायला (PMC) सर्वसाधारण सभेची मान्यता

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 26 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts